rohini-khadse-vs-chitra-wagh-controversy-2026-social-media-reaction-tukaram-abhang : खडसेंचा जोरदार पलटवार, तुकोबारायांच्या अभंगातून सुनावलं प्रत्युत्तर
Mumbai : राज्याच्या राजकारणात पुन्हा शब्दयुद्ध पेटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या वादाला आता अधिक धार आली असून खडसेंनी वाघ यांना नाव न घेता टोला लगावत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी केलेल्या पोस्टनंतर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देताना “ज्यांचा बुद्धीशी काडीचाही संबंध नाही अशा ‘चित्रा’विचित्र लोकांनी बुद्धी विषयी न बोललेलं बरं” असा घणाघात केला. तसेच “माझ्या वडिलांवर बोलण्याआधी त्या पक्षाची पाळेमुळे कोणांनी घट्ट केली हे लक्षात घ्यावे” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे वाघ यांच्यावर निशाणा साधला. “आयत्या बिळावरील नागोबांनी जरा बुद्धीवर जोर देऊन बोलावं” असा टोमणाही त्यांनी लगावला.
District hospital : बैठकीच्या आड राजकीय पोळी, बुलढाण्यात आरोग्य प्रश्नांवरून राजकारण
या वादात पुढे जात रोहिणी खडसे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका अधिक तीव्र केली. “आयत्या बिळावरी नागोबा वसे, परिश्रम न करी मान मात्र हसे” या ओळींचा दाखला देत त्यांनी राजकीय टीकेला सांस्कृतिक आणि भावनिक रंग दिला.
रोहिणी खडसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत संघर्षाची भूमिका अधोरेखित करत “आम्ही जन्मतः संघर्ष करत आलो आहोत आणि संघर्षच निवडला आहे. त्यामुळे लढण्याच्या बाता आमच्या समोर नका मारू” असे स्पष्ट केले. तसेच “कारवाईच्या भीतीने आम्ही मैदान सोडले नाही आणि महिलांच्या प्रश्नांसाठी तसेच नागरिकांच्या हक्कांसाठी आम्ही आजही लढत आहोत” असेही त्यांनी नमूद केले.
Government employees on strike : १७ लाख कर्मचाऱ्यांचा एल्गार; कार्यालये ओस, जनतेची गैरसोय वाढली
या प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून आगामी राजकीय घडामोडींवर या वादाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








