व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cabinet decision : कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा; आयटी पार्कसाठी...

Cabinet decision : कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा; आयटी पार्कसाठी जमीन

maharashtra-cabinet-decision-22-april-2026-cbg-policy-it-park-satara-kem-hospital-renaming : मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब

Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली असून विविध विभागांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली असून राज्याच्या विकास आणि प्रशासनिक सुधारणा यांना गती देणारे निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर करण्यास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार असून बायोगॅस प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तसेच हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवले जाणार आहेत. या वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!

उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा देत राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या शिक्षकांना पुढील पदभरती प्रक्रियेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी जमीन देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना सुमारे 42.55 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे सातारा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

District hospital : बैठकीच्या आड राजकीय पोळी, बुलढाण्यात आरोग्य प्रश्नांवरून राजकारण

याशिवाय राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरणासाठी लागणाऱ्या अधिमूल्याच्या पुनर्रचनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय यांच्या नामांतराचा मुद्दाही चर्चेत आला आहे. भाजप आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या रुग्णालयाचे नाव बदलण्याची मागणी करत मुंबई महानगरपालिकेला पत्र दिले आहे. “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे नाव देण्याची त्यांची मागणी असून या प्रस्तावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पर्यावरण, शिक्षण, औद्योगिक विकास आणि महसूल या विविध क्षेत्रांशी संबंधित निर्णय घेतले गेल्यामुळे राज्याच्या धोरणात्मक दिशेला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!