व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana BJP : सलग पराभवानंतर भाजपने जिल्हा प्रभारी बदलला, किती फायदा होणार?

Buldhana BJP : सलग पराभवानंतर भाजपने जिल्हा प्रभारी बदलला, किती फायदा होणार?

After consecutive defeats, BJP appoints a new district in-charge : संघटनात्मक पातळीवर मोठा बदल ; जिल्हा प्रभारी म्हणून जयंत डेहनकर यांची नियुक्ती

Buldhana सलग निवडणुकांतील अपयशानंतर भारतीय जनता पक्षाने बुलढाणा जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत जयंत डेहनकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तुलनेने कमी परिचित, मात्र तळागाळातून उभे राहिलेले नेतृत्व पुढे आणत भाजपने स्थानिक राजकारणात नवे समीकरण उभे करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही नियुक्ती ‘मास्टरस्ट्रोक’ ठरेल की जोखमीचा प्रयोग, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकसंध शिवसेना-भाजप युतीच्या काळात समन्वयक म्हणून काम केलेल्या डेहनकर यांच्याकडे संघटन उभारणीचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. नागपूरच्या संघटनशैलीत तयार झालेल्या डेहनकर यांनी बूथस्तरापासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंत काम केले आहे. मात्र, बुलढाण्यातील राजकीय वास्तव अधिक गुंतागुंतीचे असून, स्थानिक गटबाजी, नाराज पदाधिकारी आणि निष्क्रिय झालेला कार्यकर्ता वर्ग यांना पुन्हा सक्रिय करणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.

Nitin Raut : नितीन राऊतांना धक्का; महापालिकेत केतन ठाकरे झाले ‘स्वीकृत’

विशेषतः शिंदेसेना-भाजप महायुतीच्या सध्याच्या समीकरणात स्थानिक पातळीवरील तणाव कमी करणे आणि समन्वय साधणे ही डेहनकर यांची पहिली कसोटी असेल. महायुतीतील अंतर्गत मतभेद, स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा आणि सत्तासमीकरणातील सूक्ष्म बदल लक्षात घेता, बाहेरून आलेल्या नेतृत्वाला स्वीकार मिळवणे सोपे नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Alka atram on pratibha Dhanorkar: सन्मान मागून मिळत नाही, अलका आत्राम यांचा खासदार प्रतिभा धानोरकरांवर प्रहार!

दरम्यान, भाजपने हा निर्णय केवळ संघटनात्मक फेरबदल म्हणून न पाहता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीचा भाग म्हणून घेतल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या चेहऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि मतदारांमध्ये विश्वास पुनर्स्थापित करणे, हा या निर्णयामागील उद्देश मानला जात आहे.

error: Content is protected !!