ritesh-deshmukh-reaction-dhirendra-shastri-shivaji-maharaj-controversy : रितेश देशमुख यांनी यांनी स्पष्ट भूमिका घेत कडक शब्दांत फटकारले
Mumbai : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी स्पष्ट भूमिका घेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले आहे. “शिवरायांबद्दलचे आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत एक ऐतिहासिक संदर्भ देत गुरु-शिष्य नात्याचा दावा केला होता. त्याचवेळी आमदार संजय गायकवाड यांनीही शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या दोन्ही विधानांमुळे राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राज्यभर दौरा करत आहेत. याच दरम्यान त्यांनी भिवंडी येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला भेट देत महाआरतीत सहभाग घेतला. माध्यमांशी संवाद साधताना रितेश यांनी सांगितले की, शिवरायांविषयी कोणतेही अपशब्द किंवा अवमानकारक विधान शिवप्रेमी कधीही सहन करणार नाहीत.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; वॉशिंग्टनमध्ये डिनरदरम्यान गोळीबार
विशिष्ट वादग्रस्त विधानांची सविस्तर माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तींचा त्यांनी स्पष्ट निषेध केला. शिवरायांप्रती असलेली श्रद्धा आणि आदर कायम राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या भेटीदरम्यान त्यांनी मंदिरातील भव्य वास्तू आणि तेथील कलाकृतींमधून उलगडलेल्या शिवइतिहासाचे कौतुक केले. शिवप्रेमातून उभारण्यात आलेल्या या शक्तीपीठाबद्दल त्यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही येथे येत राहण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आहे.
Vikas Thakre : मनपाचा कचरा घोटाळा : दंड वसूल केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम कंत्राटदारांच्या झोळीत
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, युद्धानंतर थकलेल्या अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांना देत राज्य सांभाळण्याची विनंती केली होती, ज्यावर रामदास स्वामींनी राज्यकारभार आपण चालवू आणि अंमलबजावणी शिवाजी महाराज करतील असे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या विधानावरूनच वाद अधिक तीव्र झाला आहे.








