Keche family’s humanitarian work instilled a positive outlook in society : केचे परिवाराच्या मानवतावादी कार्याने समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवला
Wardha : रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या रुद्र सुधीर केचे (१७) याच्या परिवाराने अत्यंत शोकाकुल परिस्थितीतही माणुसकीची कास धरली. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रपेढीला रुद्रचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. आणि या मरणोत्तर नेत्रदानाने दोन तरुणांना नवी दृष्टी मिळाली.
७ जानेवारी रोजी रुद्र अमरावतीहून आर्वीला घरी येत असताना तळेगाव (श्यामजीपंत) मार्गावर मांडला शिवारात त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असतानाही रुद्रची आई योगिता, वडील सुधीर आणि आजोबा माजी आमदार दादाराव केचे यांनी धीरोदत्त व निःस्वार्थ भूमिका बजावत रुद्रचे नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. आणि सावंगी मेघे रुग्णालयाला कळविले. अवघ्या काही तासांत सावंगी रुग्णालयाचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. सचिन डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञांची चमू आर्वी येथे पोहोचली आणि नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
Congress movement : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार !
दृष्टिहीन दोघे पाहणार जग
सतरा वर्षीय रुद्रच्या नेत्रदानातून एका २८ वर्षीय गरजू रुग्णावर केरॅटोप्लास्टी करण्यात आली. तर कार्निअल अल्सरने ग्रस्त असलेल्या दुसऱ्या ३२ वर्षीय रुग्णावरही या नेत्रदानातून कार्निया प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. यामुळे दोन तरुणांना उमेदीच्या काळात, नवी दृष्टी मिळाली आहे.
Bicycle rally : सायकल रॅलीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
केचे कुटुंबियांचे मानवतावादी कार्य
केचे परिवाराच्या या मानवतावादी कार्याने समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त सागर मेघे, आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, सावंगी मेघे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, रुग्ण स्वास्थ व विस्तार विभागाचे संचालक डॉ. अभय मुडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. सचिन डायगव्हाणे यांनी रुद्रच्या नातेवाईकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.