व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पालकमंत्री मात्र आढावा बैठकीत व्यस्त; वाशिममध्ये राजकीय चर्चेला उधाण

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, पालकमंत्री मात्र आढावा बैठकीत व्यस्त; वाशिममध्ये राजकीय चर्चेला उधाण

 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या किसान सभेच्या बैठकीत दुष्काळी प्रश्नांवर चर्चा

Washim : जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करत मदतीच्या प्रतीक्षेत असताना कृषीमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) किसान सभेच्या वतीने आयोजित या बैठकीत दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळण्याची प्रतीक्षा कायम असल्याने या बैठकीच्या निमित्ताने प्रशासनाच्या आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या बैठकीला कृषीमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि प्रांताध्यक्ष वसंतराव मनकर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे झालेले नुकसान आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन भरणे यांनी केले.

हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त

दरम्यान, या बैठकीचे वृत्त समोर आल्यानंतर वाशिम जिल्ह्यात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. दत्तात्रय भरणे हे केवळ राज्याचे कृषीमंत्री नसून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक नुकसानीचे प्रश्न आणि मदतीची आवश्यकता याबाबत त्यांच्याकडून ठोस निर्णय व कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘प्रहार’सोबतच शिंदेसेनेचीही धुरा बच्चू कडूंच्या खांद्यावर?

एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला बैठका आणि आढाव्यांमधून प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे केवळ बैठका घेऊन किंवा पदाधिकाऱ्यांना आवाहन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि संकटातून सावरण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीनंतर आता शासनाकडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात आणि मदत कधी मिळते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!