व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Maharashtra Navnirman Sena : मनसेत मोठे फेरबदल लवकरच?; मरगळ झटकण्याच्या सूचना

Maharashtra Navnirman Sena : मनसेत मोठे फेरबदल लवकरच?; मरगळ झटकण्याच्या सूचना

Major reshuffle likely soon in Maharashtra Navnirman Sena : बाळा शेंडगे यांची संघटन बांधणीला गती; राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मनसेत हालचाली

Malkapur महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या संघटनात्मक बदलांची चाहूल लागली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर नव्याने संघटन उभारणीचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रदेश सरचिटणीस तथा बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख बाळा शेंडगे यांनी पक्षातील मरगळ दूर करून नव्या जोमाने कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

२५ एप्रिल रोजी मलकापूर येथील विश्रामगृहात नांदुरा व मलकापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची सध्यस्थिती, कार्यकर्त्यांची भूमिका आणि आगामी राजकीय धोरणावर सखोल चर्चा करण्यात आली. गेल्या काही काळापासून पक्षात निर्माण झालेली निष्क्रियता दूर करण्यासाठी ठोस आणि व्यापक पावले उचलली जाणार असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले.

 

cooperative elections : काटोडा गावाचा ऐतिहासिक निर्णय; सहकारी निवडणुकीत पक्षीय राजकारणाला ‘नो एंट्री’

बैठकीतील सर्व मुद्द्यांचा सविस्तर अहवाल थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेंडगे यांनी पुढे सांगितले की, नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच जुन्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर करून पक्ष अधिक बळकट केला जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांची नव्याने मांडणी केली जाणार आहे. या धोरणामुळे मनसेत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Buldhana politics : रामसेतू पुलाला मंजुरी; बुलढाण्यात ‘श्रेयवाद’ पेटला

या बैठकीला संजय पळसकर, दीपक राठोड, विनोद टिकार, अशोक पाटील, पंकज पाटील, भागवत उगले, सागर जगदाळे, नानासाहेब बाबर, निखिल चिम, दीपक राऊत, किशोर रोडे, दुर्गेश ढोलकर, निखील पोंदे, मोनू केणे, रितेश भोपळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मलकापूर येथील या बैठकीनंतर मनसेच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात पक्षात मोठे संघटनात्मक बदल घडण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.

error: Content is protected !!