Uddhav thackeray shivsena leader lala ingale likely to join new party : उद्धवसेनेतून शिंदेसेनेकडे झुकाव; नांदुऱ्याच्या राजकारणात नवे समीकरण!
Nandura शहराच्या राजकीय वर्तुळात माजी उपनगराध्यक्ष तथा उद्धवसेनेचे शहराध्यक्ष लाला इंगळे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या या निर्णयामागे नेमकी नाराजी आहे की सत्तेची रणनीती, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
इंगळे यांनी उद्धवसेनेला सोडचिठी देत शिंदेसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामागील पार्श्वभूमी तपासली असता, गत निवडणुकीतील घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एकेकाळी राजेश एकडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे इंगळे यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारत पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले होते. मात्र, त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पक्षांतर्गत उपेक्षा वाढल्याची भावना इंगळे समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.
Maharashtra Navnirman Sena : मनसेत मोठे फेरबदल लवकरच?; मरगळ झटकण्याच्या सूचना
त्यातच सध्या नगरपरिषदेत भाजप-शिंदेसेनेची सत्ता असल्याने विरोधी बाकावर राहून विकासकामे मार्गी लावण्यात अडचणी येत असल्याची वस्तुस्थितीही समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि सत्तेत थेट सहभाग मिळवण्यासाठी इंगळे यांनी हा ‘राजकीय टर्न’ घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नांदुऱ्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.








