Rohit Pawar cancels Buldhana tour; tents and chairs removed ahead of the march : बुलढाण्यात हाय होल्टेज ड्रामा: भारतीय कम्युनिष्ट पक्ष मोर्चावर ठाम
Buldhana शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वाद वाढतच असल्याचे चित्र आहे. या पुस्तकाच्या प्रकाशाला शिव्या घालणार्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी 28 एप्रिल रोजी बुलढाण्यात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तसेच या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात येणार होते.
मात्र, 28 एप्रिल रोजी बुलढाण्यात हाय होल्टेज राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. आमदार रोहीत पवार यांचा दौरा रद्द झाल्यानंतर आता मोर्चा सूरू होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी सुरू असताना सभेसाठी टाकण्यात आलेला मंडप आणि खुर्च्या चक्क उचलून नेण्यात आल्या आहेत. या कारनामा आमदार संजय गायकवाड यांच्या माणसांनी केल्याच्या आरोप कम्युनिष्ट पक्षांनी केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर राज्यभरात टिका झाली होती.तसेच 28 एप्रिल रोजी आमदार रोहीत पवार यांनी बुलढाण्यात मोर्चा काढण्याची घोषण केली होती. मात्र, मोर्चाच्या दिवशीच आ.पवार यांचा दौरा रद्द झाला.
Buldhana congress : पदयात्रेतून अंतर्गत युद्ध पेटले; काँग्रेसमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा
तसेच भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने मोर्चाची तयारी सुरू आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी बुलढाणा शहरातील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानाजवळ खुर्च्या आणि मंडप टाकण्यात येत होता. मोर्चाला काही तासाचा अवधी असतानाच मंडप आणि खुर्च्या काढून नेण्यात आल्या. मंडप आणि खर्चीचे काम स्थानिक बिछायत वाल्याला देण्यात आले होते.
मात्र, आता मंडप आणि खुर्च्या काढून नेण्यात आल्याने आणखी राजकारण तापणार आहे. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्या माणसांनी या खुर्च्या काढून नेल्याचा आरोप भारतीय कम्युनिष्ट पक्षाने केला आहे. मोर्चा काढण्यापूर्वीच बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले आहे.
Agriculture service centre : आम्ही चोर नव्हे, तर शेतकऱ्यांना सेवा देणारे व्यावसायिक आहोत
राज्यभरात टिका झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलीगिरी व्यक्त केली होती. मात्र प्रशांत आंबी यांनी ही दिलगिरी नाकारल्यानंतर आता गायकवाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.








