व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Agriculture service centre : आम्ही चोर नव्हे, तर शेतकऱ्यांना सेवा देणारे व्यावसायिक...

Agriculture service centre : आम्ही चोर नव्हे, तर शेतकऱ्यांना सेवा देणारे व्यावसायिक आहोत

Indefinite strike by Agri centre operators begins; aggressive stance over pending demands : कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंद सुरू; मागण्यांसाठी आक्रमक भूमिका

Buldhana राज्यभरातील कृषी केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळत असून, ‘माफदा’ संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी साहित्य विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रे बंद ठेवण्यात आली असून, शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या बंदमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एप्रिलअखेरीस शेतकरी खत-बियाण्यांची तयारी सुरू करतो; मात्र दुकाने बंद असल्याने आवश्यक साहित्य मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

कृषी केंद्र चालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “आम्ही चोर नव्हे, तर शेतकऱ्यांना सेवा देणारे व्यावसायिक आहोत,” असे स्पष्ट केले. खत विक्रीत नफा कमी असून ‘लिंकिंग’मुळे नको असलेली उत्पादने घ्यावी लागतात, अशी तक्रार त्यांनी केली. तसेच शासनाचे साथी अॅप ग्रामीण भागात प्रभावीपणे वापरणे कठीण असल्याने त्यावरील अटी शिथिल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Water shortage : आढावा बैठकीत 82 गावांतील पाणीटंचाई गाजली; हलगर्जी करणारे अधिकारी रडारवर

दुकाने बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बाजारातून परत जावे लागले. खरीपपूर्वी आवश्यक निविष्ठा वेळेत मिळाल्या नाहीत, तर उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

‘बुलढाणा कृषी केंद्र चालक संघटनेचे पदाधिकारी सुनील देशमुख यांनी सांगितले की, “कंपनीकडून येणारे सीलबंद बियाणे विकताना दोष निघाल्यास थेट विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. कंपनीऐवजी विक्रेत्यांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे.”

Anil Deshmukh : खतांच्या किमतीत ८५ टक्क्यांपर्यंत वाढ; सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम

खत विक्रीतील ‘लिंकिंग’ बंद करून डीलर मार्जिन वाढवणे, अनधिकृत HTBT बियाण्यांवर कडक कारवाई, ‘साथी’ अॅपची सक्ती रद्द करणे, सीलबंद निविष्ठांबाबत विक्रेत्यांवरील फौजदारी कारवाई थांबवणे, बी-बियाणे व कीटकनाशक कायद्यात आवश्यक बदल, आदी मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

error: Content is protected !!