व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sureshkumar jethaliya : अजितदादांचे विश्वासू नेते, सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराने निधन

Sureshkumar jethaliya : अजितदादांचे विश्वासू नेते, सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराने निधन

former-partur-mla-sureshkumar-jethaliya-passes-away-heart-attack-ajit-pawar-close : निष्ठावान, अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख राष्ट्रवादीला मोठा धक्का

Jalna: जालना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आणि परतूरचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावान आणि अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे जालना जिल्ह्यासह परतूर-मंठा मतदारसंघात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरेशकुमार जेथलियायांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. २००९ साली त्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व करत विकासकामांना गती दिली होती. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा आणि स्थानिक विकासाशी संबंधित अनेक कामे मार्गी लागल्याची चर्चा आजही परिसरात केली जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे आणि जनसंपर्कात मजबूत पकड असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

Sunetra pawar : महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार !

राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेस पक्षातून काम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा प्रभाव जाणवत होता.

त्यांच्या निधनामुळे जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. परतूर आणि मंठा परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

___

error: Content is protected !!