व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mamata banerjee : पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांच्या ममता राजवटीचा अस्त

Mamata banerjee : पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांच्या ममता राजवटीचा अस्त

west-bengal-mamata-banerjee-government-dissolved-bjp-government-formation-rn-ravi-kolkata : राज्यपालांच्या निर्णयानंतर भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Kolkata : पश्चिम बंगालच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोड घडली असून राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारचा अधिकृत अंत झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्याने राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला होता. अखेर राज्यपालांनी भारतीय संविधानातील अधिकारांचा वापर करत विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आणि बंगालमध्ये सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला.

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला होता. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी हा जनादेश नसून कटकारस्थान असल्याचा दावा केला होता. मतमोजणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला तसेच निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. जवळपास शंभर मतदारसंघांमध्ये जनादेश लुटला गेला असल्याचं सांगत त्यांनी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Collector of Nagpur: नायब तहसीलदारांना जेसीबीने फरफटत नेणाऱ्या मुजोर मालकाची रवानगी जेलमध्ये

ममता बॅनर्जी यांनी “मी हरलेली नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव आणखी वाढला होता. मात्र विधानसभा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर राज्यपालांनी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नाहीत आणि राज्यातील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अध्याय संपुष्टात आला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर ९ मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय उलथापालथीनंतर ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा त्यांनी केला. “मी आता सामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहील,” अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

Nagpur municipal corporation : बसपा नगरसेविका हर्षला जयस्वाल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला असून आगामी काळात राज्यातील प्रशासन, कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!