व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra fadnavis : “पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा सहन केली जाणार नाही”

Devendra fadnavis : “पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा सहन केली जाणार नाही”

devendra-fadnavis-action-on-pm-modi-austerity-appeal-ministers-foreign-tours-restricted : मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर, मंत्र्यांचे ताफे कमी तर विदेश दौऱ्यांवर निर्बंध

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आर्थिक काटकसरीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारही आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. परकीय चलन बचत, वाढती महागाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय जाहीर केले असून मंत्र्यांचे ताफे कमी करण्यासह मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा करणाऱ्यांवरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधत विरोधकांनी किमान या विषयाची चेष्टा तरी करू नये, असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, सध्या जागतिक स्तरावर अत्यंत गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनटंचाई, वाढती महागाई आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही उपाययोजना सुचवल्या असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

Chandrashekhar bawankule : शरद पवार-सुनील तटकरे भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहू नका; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला

फडणवीस म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचा कमी वापर, खाद्यतेल बचत, सोने खरेदी टाळणे आणि आयात होणाऱ्या वस्तूंचा वापर कमी करणे यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही याबाबत प्रत्यक्ष पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांचे ताफे कमी करण्यात येत असून सरकारी खर्चात कपात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांवर निर्बंध आणले जात असून आवश्यक तेव्हाच अशा दौऱ्यांना मंजुरी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, परकीय चलन खर्च होणाऱ्या बाबींची खपत कमी करण्यासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्न करत आहे. देशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र धोरणात्मक पावले उचलण्यावरही विचार सुरू आहे. हे बदल एका दिवसात होणार नाहीत, मात्र सुरुवात होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “देशासाठी पंतप्रधानांनी सहा महिने मागितले असतील तर ते देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur airport: नागपूर विमानतळाला अखेर ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा; कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाचे ‘टेक-ऑफ’

दरम्यान, विरोधकांकडून पंतप्रधानांच्या आवाहनावर होत असलेल्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिले. “जर विरोधकांना या उपाययोजनांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी किमान त्याची थट्टा-मस्करी करू नये,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. देश आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी फडणवीस यांनी नागपूर विमानतळाच्या विकासाबाबतही मोठी माहिती दिली. नागपूर विमानतळ ब्राऊनफिल्ड विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

___

error: Content is protected !!