व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dilip Sananda Dnyaneshwar Patil : सानंदांनंतर सक्रिय झालेले पाटील पुन्हा बॅकफूटवर? काँग्रेस...

Dilip Sananda Dnyaneshwar Patil : सानंदांनंतर सक्रिय झालेले पाटील पुन्हा बॅकफूटवर? काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

After becoming active following Sanandan’s exit, Patil back on the backfoot again : खामगाव काँग्रेसमध्ये नेमके चाललेय काय? ज्ञानेश्वर पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

Khamgao खामगाव काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असताना, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात उतरलेले शेगावचे नेते ज्ञानेश्वर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या स्थानिक घडामोडींमध्ये फारसे सक्रिय दिसत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पूर्वी सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारे आणि विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावणारे पाटील सध्या केवळ निवडक कार्यक्रमांपुरते मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात भविष्यातील काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हुकल्यानंतर त्यांनी काही काळ पक्षीय राजकारणापासून अंतर राखल्याची चर्चा होती. त्यानंतर माजी आमदार दिलीप सानंदा यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर पाटील पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाच्या शक्यतांना बळ मिळाले होते.

Ncp executive list : राष्ट्रवादीची तिजोरी आता पूर्णपणे पवार कुटुंबीयांच्या ताब्यात?

मात्र, आता पुन्हा त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाल्याने खामगाव काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मानले जात आहेत. पक्षातील अंतर्गत समीकरणे, नेतृत्वाची अनिश्चितता आणि आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.याबाबत पक्षातील कुणीही अधिकृत भूमिका घेत नसले तरी स्थानिक काँग्रेस वर्तुळात मात्र विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात ज्ञानेश्वर पाटील पुन्हा आक्रमकपणे सक्रिय होणार की शांत भूमिकाच कायम ठेवणार, याबाबत राजकीय उत्सुकता वाढली आहे.

error: Content is protected !!