Relief to paddy farmers : धान उत्पादकांची दीड महिना प्रतीक्षा
Gondia शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे गेल्या दीड महिन्यापासून थकले होते. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाने शुक्रवारी (दि.२४) २४२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना दिला मिळाला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत नोंदणी केलेल्या १ लाख ५० हजार ६६६ शेतकऱ्यांपैकी ७५ हजार १५३ शेतकऱ्यांनी २३ लाख ४८ हजार ३६५ क्विंटल धानाची विक्री केली आहे. फेडरेशनने आतापर्यंत एकूण ५४० कोटी रुपयांच्या धानाची खरेदी केली आहे. यापैकी २९४ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दीड महिन्यापासून थकले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाईकांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती.
CM Devendra Fadnavis : प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’
थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने शुक्रवारी २४२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोमवारपासून जमा केले जाणार आहेत. असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले. यामुळे दीड महिन्यापासून चुकाऱ्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अर्धे शेतकरी अद्यापही धान विक्रीपासून वंचित आहे. पण शासकीय धान खरेदी केंद्र ३१ जानेवारीपर्यंतच सुरु राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित पाच दिवसात शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागणार आहे.
Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रथमच बिनविरोध!
बोनसचे आदेश कधी?
शासनाने धानाला प्रोत्साहान अनुदान पुन्हा हेक्टरी २० हजार रुपये बोनसची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. पण यासंबंधीचे आदेश अद्यापही निघालेले नाही. त्यामुळे बोनससाठी पात्र ठरलेल्या १ लाख ५० हजार ६६६ शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे.








