व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chandrashekhar bawankule : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न

Chandrashekhar bawankule : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न

chandrashekhar-bawankule-claim-on-unopposed-vidhan-parishad-election-nagpur : ‘७५ टक्के मते आमच्याकडेच’ बावनकुळे यांचा मोठा दावा

 

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाकडे या मतदारसंघात ७५ टक्क्यांहून अधिक मतदार असल्याचा दावा करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच या निवडणुकीत विजयी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याचवेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे विरोधकांवर अप्रत्यक्ष दबाव टाकत भाजपने संवादाचे राजकारण सुरू केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

नागपूर जिल्ह्यातील विविध विकासकामे, पाणीटंचाई आणि आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. “नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे स्पष्ट वर्चस्व आहे. त्यामुळे विनाकारण निवडणूक लढवण्याऐवजी ती बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सर्व पक्षांशी सकारात्मक चर्चा करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Bjp conflict : ‘मेरा नंबर कब आयेगा?’ नागपूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विदर्भात निर्माण झालेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने नागपुरात विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना बावनकुळे यांनी नागपुरात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. “केंद्र सरकारकडून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. काही ठिकाणी स्थानिक ट्रान्सपोर्ट किंवा वितरकांच्या तांत्रिक कारणांमुळे अडथळे निर्माण झाले असतील, मात्र ती परिस्थिती तातडीने हाताळली जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस वाहनांमध्ये डिझेल नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली आहे. शासकीय यंत्रणेत कुठेही इंधनाची कमतरता नाही.”

Neet paper leak : मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

ऊर्जा आणि पाणी संकट टाळण्यासाठी राज्यातील विविध यंत्रणा सोलर ऊर्जेकडे वळवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यात वीज निर्मितीसाठी कोळसा किंवा पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्पांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. अनेक भागांत भूजल उपसा मर्यादेपेक्षा जास्त होत असल्याने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांच्या पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून पाणी कपातीचा निर्णय लागू केला जाईल,” असे ते म्हणाले.

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणधुमाळी सुरू

रेशन धान्य वितरणातील गैरप्रकार रोखण्यासाठीही सरकारने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावांमध्ये ज्यांना प्रत्यक्षात रेशनची गरज नाही अशा सधन लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी केली जाणार असून केवळ पात्र नागरिकांनाच ‘प्राधान्य गटात’ ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पारदर्शक पद्धतीने धान्य वितरण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील किरण सामंत यांच्याशी संबंधित कथित तस्करीच्या प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर उत्खननावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. जिल्ह्यांमध्ये काळाबाजार रोखण्यासाठी विशेष फ्लाइंग स्कॉड तैनात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना टोला

नागपूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या दगड खाणींमुळे निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यांबाबतही महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मॉयल आणि वेकोलि यांना संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून यासाठी आठ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या खड्ड्यांमध्ये विविध वीज प्रकल्पांमधून निर्माण होणारी राख आणि माती टाकून ते बुजवले जाणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल, अशी माहितीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

error: Content is protected !!