Congress’ organizational rebuilding on the strength of new leadership : पदग्रहण सोहळ्यानंतर तापले राजकारण, स्थानिक निवडणुकांवर लक्ष
Akola जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश तायडे आणि महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांच्या पदग्रहण सोहळ्याने अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वराज भवन येथे पार पडलेला हा सोहळा केवळ पदग्रहणापुरता मर्यादित न राहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नव्या संघटनात्मक रणनीतीचे शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही वर्षांपासून संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसला नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आक्रमक आणि गतिमान चेहरा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला. पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि विविध फ्रंटल सेलचे प्रतिनिधी एकाच मंचावर आल्याने काँग्रेसने एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे काँग्रेसमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला टोला
माजी मंत्री प्रा. अजहर हुसेन यांनी केंद्र सरकारवर टीका करत देशातील जनतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी वाढत असल्याचा दावा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे पर्याय म्हणून पाहिले जात असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा काँग्रेसला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या नेतृत्वावर संघटनात्मक ताकद वाढविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगत प्रकाश तायडे आणि महेंद्र गवई हे कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी ग्रामीण भागातील काँग्रेसची पारंपरिक ताकद पुन्हा उभी करण्याची क्षमता प्रकाश तायडे यांच्यात असल्याचे सांगितले. तर शहरातील संघटना नव्याने सक्रिय करण्याचे काम महेंद्र गवई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Tukaram mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये; तीन दिवसांत 53 धाडी !
आमदार साजिद खान पठाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष उभारेल, असा इशारा दिला. अकोल्यातील ‘उर्दू घर’ प्रकल्पासाठी राज्य शासनाने १२ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याची माहिती देत हा निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








