व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला...

Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला टोला

“Allow triple riding to save fuel!”; Uddhav Thackeray’s Shiv Sena demands government approval : परिवहन मंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाचा पलटवार; ‘उपदेश नव्हे, नियम शिथिल करा’

Malkapur राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’ असा संदेश देत नागरिकांना डिझेल-पेट्रोल काटकसरीने वापरण्याचे आवाहन केल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारवर उपरोधिक टीका करत मलकापूर येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. इंधन बचतीच्या नावाखाली सरकारने ट्रिपल सीट आणि वाहनांमधील ओव्हरलोडिंगला परवानगी द्यावी, अशी मागणी करत पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनातून सरकारच्या इंधन बचतीसंदर्भातील भूमिकेवर राजकीय टीका करण्यात आली. वाढती महागाई, वाढलेला प्रवास खर्च आणि ग्रामीण भागातील बदलती गरज लक्षात घेता केवळ सल्ले देऊन इंधन बचत शक्य नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

Tukaram mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये; तीन दिवसांत 53 धाडी !

निवेदनात म्हटले आहे की, आज बहुतांश कुटुंबांकडे गरजेनुसार एकापेक्षा अधिक वाहने आहेत. शेतमजुरी, शेतीकामे आणि रोजंदारीसाठी ग्रामीण भागात वाहनांचा वापर वाढला असून, नागरिकांना ‘काटकसरीने इंधन वापरा’ असा सल्ला देणे व्यवहार्य वाटत नाही. सरकारला खरोखरच इंधन बचत साध्य करायची असल्यास वाहतूक नियमांमध्ये काही व्यावहारिक बदल करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Chhagan bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचे लॉबिंग तेजीत

यामध्ये दुचाकी वाहनांवर तीन व्यक्तींना (ट्रिपल सीट) प्रवास करण्यास परवानगी देणे, तसेच चारचाकी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा काही अतिरिक्त प्रवाशांना वाहतूक करण्यास मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे वाहनांची संख्या कमी होऊन इंधन बचतीस मदत होईल, असा उपरोधिक टोला आंदोलकांनी सरकारला लगावला.

error: Content is protected !!