व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : पेट्रोल पाच रुपयाने महागले भाजपचे कार्यकर्ते कुठे लपून बसले?;...

Vijay Wadettiwar : पेट्रोल पाच रुपयाने महागले भाजपचे कार्यकर्ते कुठे लपून बसले?; वाडेट्टीवारांचा टोला

Vijay Wadettiwar alleges that the BJP made life difficult for the poor and middle class after coming to power : भाजपने सत्तेत आल्यावर गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जगणे मुश्कील केल्याचा आरोप

Nagpur काँग्रेसच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून गळे काढणारे भाजपचे नेते आज स्वतः सत्तेत आल्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत का? असा संतप्त सवाल करत काँग्रेस चे नेते विजय वडेट्टीवर यांनी भाजपला टोला लागवला.

आज ब्रम्हपुरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महागाई, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि ओबीसी समाजाची झालेली फसवणूक या मुद्द्यांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान बोलताना वडेट्टीवर यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली.

पूर्वी महागाईवर मोठ्या बाता मारणाऱ्या भाजपने आज सत्तेत आल्यावर देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे पाप या नाकर्त्या सरकारने केले असून, एकीकडे जनता महागाईने होरपळत असताना दुसरीकडे मोदी सरकार मात्र ‘मेलोडी चॉकलेट’ वाटण्यात आणि इव्हेंटबाजीत व्यस्त असल्याचा टोला आंदोलकांनी लगावला.

Legislative elections : सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; भाजपमध्ये चर्चांना उधाण, डॉ. राजीव पोतदारांचे तिकीट फायनल झाले का हो?

दुसरीकडे देशाचा अन्नदाता असलेला शेतकरी आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. धानाला योग्य भाव मिळत नाही, तर कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी बाजारात आपल्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हवालदिल झाला आहे. परंतु, या शेतकरीविरोधी सरकारला अन्नदात्याच्या अश्रूंची काहीच पडलेली नाही, असा आरोप करत काँग्रेसने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; बुलढाण्यात तीव्र आंदोलन

याच जोडीला ओबीसी आरक्षणावरून आणि जातनिहाय जनगणनेवरून मोदी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. ओबीसींची जातनिहाय जनगणना करू अशा मोठ्या घोषणा सरकार करते, मात्र प्रत्यक्ष जनगणनेची प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच ठेवला जात नाही, हा ओबीसी समाजाचा फार मोठा विश्वासघात आणि फसवणूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोदी सरकारच्या या अन्यायाविरोधात आणि जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या या आंदोलनाने ब्रम्हपुरीत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

error: Content is protected !!