व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; बुलढाण्यात तीव्र आंदोलन

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; बुलढाण्यात तीव्र आंदोलन

BJP turns aggressive over remarks by Harshvardhan Sapkal; intense protest erupts in Buldhana : मोदी-फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपकडून निषेध; काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी

Buldhana काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार, दि. २८ मे रोजी बुलढाण्यात आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयराज शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली.

Congress srujan abhiyan : नव्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे रणशिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेली भाषा अयोग्य व निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जनभावना दुखावल्याचा आरोप केला. विरोधकांनी प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील भाषा वापरणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनादरम्यान “हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद”, “मोदींचा अपमान सहन केला जाणार नाही” तसेच काँग्रेसच्या भूमिकेविरोधातील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत राजकीय सभ्यता राखण्याची मागणी केली.

Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला टोला

या आंदोलनात जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, मंदार बाहेकर, सतीश भाकरे, चंद्रकांत बर्दे, विलास मानवतकर, मुन्ना बेंडवाल, वर्षाताई पाथरकर, अजित गुळवे, शोभाताई ढवळे, संदीप नरोटे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, राजेंद्र खरात, अभिमन्यू करपे, अण्णासाहेब पवार, सतीश देहाडराय, माजी सैनिक अशोक किलबिले, अरविंद जाधव, प्रा. प्रभाकर वारे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!