व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative elections : सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; भाजपमध्ये चर्चांना उधाण, डॉ. राजीव...

Legislative elections : सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; भाजपमध्ये चर्चांना उधाण, डॉ. राजीव पोतदारांचे तिकीट फायनल झाले का हो?

Dr. Rajiv Potdar’s candidature for the Legislative Council is almost certain : मुख्यमंत्री उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीत, घोषणा होण्यापूर्वीच सोशल मीडियावर अभिनंदन

Nagpur नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोतदार यांचे तिकीट फायनल झाले का हो? अशी विचारणा एकमेकांना केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उमेदवारांच्या नावांची शॉर्टलिस्ट घेऊन सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही यादी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत असतानाच, नागपुरात मात्र सोशल मीडियावरील एका पोस्टने खळबळ उडवून दिली.

राजीव पोतदार यांना अखेर न्याय मिळाला…” या आशयाची पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर टाकताच ती वाऱ्यासारखी पसरली. यानंतर नागपूरच्या माजी महापौर आणि राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांच्यासह अनेकांनी पोतदार यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. मात्र, या सर्व घडामोडींवर स्वतः डॉ. राजीव पोतदार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मला अद्याप पक्षाकडून तिकीट फायनल झाल्याचा कोणताही अधिकृत फोन आलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. पोतदारांच्या या आवाहनानंतर काही समर्थकांनी आपल्या पोस्ट डिलीटही केल्या आहेत.

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; बुलढाण्यात तीव्र आंदोलन

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेसाठी डॉ. राजीव पोतदार हे सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पक्षाने दिल्लीला पाठवलेल्या तीन नावांच्या पॅनेलमध्ये त्यांचा समावेश असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या नावासाठी आग्रही आहेत. मध्यंतरी एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बावनकुळेंच्या उपस्थितीत पोतदार यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला आमदार करा, असे जाहीर आवाहन केले होते. नागपूर शहरातून यापूर्वीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना विधान परिषदेवर पाठवले गेल्यामुळे, आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ग्रामीण भागातील चेहऱ्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Congress srujan abhiyan : नव्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे रणशिंग

दरम्यान, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखानी यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर नागपूरसाठी भाजपने पाठवलेल्या तीन नावांमध्ये डॉ. राजीव पोतदार यांच्यासह ओबीसी समाजाचे अविनाश ठाकरे आणि नागपूर शहराचे भाजप अध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नावांचा समावेश आहे. आता दिल्लीश्वरांच्या दरबारातून नेमकी कोणाच्या नावावर अधिकृत मोहर उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!