62 forms taken, but not a single nomination filed for amravati legislative election : विधान परिषद निवडणुकीसाठी बाजोरिया पिता-पुत्रांनी अर्ज घेतल्याची नोंद
Amravati अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, चौथ्या दिवशी १० संभाव्य उमेदवारांसाठी १७ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत एकूण ३५ संभाव्य उमेदवारांनी ६२ अर्जांची उचल केली आहे. मात्र, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
शनिवार, ३० मे रोजी सुटीचा दिवस असला तरी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असून, शेवटच्या दिवशी निवडणूक विभागात मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी उद्योगपती विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया या पिता-पुत्रांसाठीही उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील चर्चेत असलेल्या जवळपास सर्व संभाव्य इच्छुकांनी अर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता संबंधित पक्षांकडून अधिकृत उमेदवारी कोणाला जाहीर केली जाते, याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Fuel price hike : ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या’, ‘जनतेचा पैसा परत द्या’
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. मतदार यादी अंतिम करण्याबरोबरच सात मतदान केंद्रांची उभारणी, आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती आणि इतर प्रशासकीय कामे पूर्ण केली जात आहेत. यावेळी अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतपत्रिका फिकट गुलाबी रंगाची असणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.








