BJP criticises Congress MLA over the ‘Urdu Ghar’ project : अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप
Akola उर्दू घर प्रकल्पाच्या श्रेयावरून अकोल्यातील राजकारण तापले असून भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख शेरूभाई यांनी काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. उर्दू घराला मंजुरी आणि निधी महायुती सरकारच्या काळात मिळाला असून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेरूभाई यांनी दावा केला की, २०१६ आणि २०२२ मध्ये महायुती सरकारने अल्पसंख्याकांची लोकसंख्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या भागांमध्ये उर्दू भाषा, साहित्य आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी उर्दू घर उभारणीचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) देखील प्रसिद्ध करण्यात आला होता.
Ladki bahin yojana : 80 लाख महिला अपात्र, 1500 रुपयांचा मासिक लाभ होणार बंद !
त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील प्रक्रिया मार्गी लावली, असा दावा त्यांनी केला. तसेच दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी अल्पसंख्याक समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच उर्दू घरासाठी जागा आणि निधी उपलब्ध होऊ शकला, असेही त्यांनी नमूद केले.
Sting operation : खळबळजनक… केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष दाखवत २० कोटींची मागणी!
उर्दू घराच्या उभारणीचे श्रेय काँग्रेसकडून घेतले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेरूभाई यांनी आमदार साजीद खान पठाण यांच्यावर टीका करत, विकासकामांच्या बाबतीत खोटे श्रेय घेण्याची प्रवृत्ती थांबवावी, असे म्हटले आहे. भाजप ‘सबका साथ, सबका विकास’ या भूमिकेतून सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उर्दू घराच्या श्रेयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आगामी स्थानिक राजकारणात आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.








