व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Targets bjp : महायुतीत पुन्हा धुसफूस; ‘मित्रपक्षासारखी वागणूक मिळत नसल्याची खंत

Targets bjp : महायुतीत पुन्हा धुसफूस; ‘मित्रपक्षासारखी वागणूक मिळत नसल्याची खंत

mla-narendra-bondekar-targets-bjp-after-abdul-sattar-and-sanjay-gaikwad-mahayuti-tensions : अब्दुल सत्तार, संजय गायकवाड यांच्यानंतर आमदार नरेंद्र बोंडेकर यांचाही भाजपवर निशाणा

Mumbai : महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा उघडपणे समोर आली आहे. आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संजय गायकवाड यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही उघडपणे भाजपवर टीका करत पक्षातील अस्वस्थतेला वाचा फोडली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मतभेद अधिक स्पष्टपणे दिसून येत आहेत. भंडाऱ्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अपेक्षित सहभाग नोंदवला नसल्याची चर्चा आहे. आमदार नरेंद्र बोंडेकर स्वतःही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

loan waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी मोठी अट; राज्य सरकारचे निकष जाहीर !

माध्यमांशी संवाद साधताना नरेंद्र बोंडेकर यांनी भाजपवर थेट आरोप करत अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली नाराजी योग्य असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, केवळ काही जिल्ह्यांपुरती ही समस्या मर्यादित नसून भंडारा जिल्ह्यातही शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजप मित्रपक्षाप्रमाणे वागत नसल्यामुळेच अनेक ठिकाणी नाराजी वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
जे+
भाजपच्या काही नेत्यांकडून मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा अपमान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. समन्वय समितीच्या बैठकीत अपमानास्पद वर्तन करणाऱ्या नेत्यांना पक्ष नेतृत्वाने आवर घालण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक पातळीवर मित्रपक्षांमध्ये आवश्यक असलेला समन्वय आणि संवादाचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यातील विकासकामांच्या निधी वाटपावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनाही विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
\
नरेंद्र बोंडेकर यांनी भाजप नेते त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप केला. निवडणुकीच्या काळातच मित्रपक्षांची आठवण काढली जाते, मात्र इतर वेळी त्यांना योग्य सन्मान आणि सहकार्य दिले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Anil Deshmukh on Obc andolan : ओबीसी जनआंदोलनाचा वणवा पेटणार, अनिल देशमुखांचा इशारा

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी शिवसेना कार्यकर्ते सहकार्य करतील, असे सांगतानाच पक्षातील नाराजी आणि असंतोष दुर्लक्षित करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उफाळून आलेली ही नाराजी आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणावर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुतीतील मित्रपक्षांमधील समन्वय आणि संवाद कायम ठेवण्याचे आव्हान आता नेतृत्वासमोर उभे राहिले आहे.

error: Content is protected !!