व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Malkapur municipal council: घरात पाणी, प्रशासन झोपी! वाकोडी ग्रामस्थांचा रास्तारोको

Malkapur municipal council: घरात पाणी, प्रशासन झोपी! वाकोडी ग्रामस्थांचा रास्तारोको

Uddhav Thackeray Shivsena protest against administration for deepening of the drain : उध्दव सेनेच्या नेतृत्वात आंदोलन; नाल्यांचे खोलीकरण तातडीने करण्याची मागणी

Malkapur पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही नाल्यांचे खोलीकरण न केल्याने संतप्त झालेल्या वाकोडी ग्रामस्थांनी बुलढाणा रोडवरील बोदवड चौफुली येथे जोरदार रास्तारोको आंदोलन छेडले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

दरवर्षी दाताळा परिसरातून येणारे पावसाचे पाणी रस्त्यालगतच्या उथळ नाल्यांमुळे थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. तुलसीनगर, शिवशक्तीनगर, नालंदानगर, वृंदावननगर (भाग १ ते ४), हनुमाननगर, आनंद सोसायटी, हरिकिरण सोसायटी, गोपाळकृष्णनगरसह अनेक वस्त्यांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. साचलेल्या पाण्यात साप-विंचूंचा वावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

School bus fare : शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के भाडेवाढ लागू

ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याचा आरोप करत अखेर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी गजानन ठोसर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत, नाल्यांतील पाणी नळगंगा नदीपात्राकडे वळविण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
“नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच नियोजन करणे आवश्यक होते,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत ८१ लाख अपात्र लाभार्थ्यांना कोट्यवधींचा लाभ

या आंदोलनात शहरप्रमुख हरिदास गणबास, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, नगरसेवक रफीक बर्तनवाले, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत तहसीलदार समाधान सोनवणे यांनी तातडीची बैठक बोलावली. तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणांना दोन दिवसांत प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामांवर विश्वास असल्याचे सांगत ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे.

error: Content is protected !!