व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Paver block work : पेव्हर ब्लॉकच्या कामांवर नियंत्रण, कंत्राटदारांचे टेंशन वाढले

Paver block work : पेव्हर ब्लॉकच्या कामांवर नियंत्रण, कंत्राटदारांचे टेंशन वाढले

Restrictions on paver block projects tighten; contractors under pressure, MLA adopts a cautious stance : ४५९ कामांमध्ये फक्त २४ कामे प्रस्तावित; आमदारांची सावध भूमिका

Buldhana गेल्या काही वर्षांत आमदार स्थानिक विकास निधीतील कामांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा मोठा बोलबाला होता. गावोगावी अंतर्गत रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याने त्यावरून सातत्याने चर्चा आणि टीकाही होत होती. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षातील आमदार निधीच्या प्रस्तावित कामांची आकडेवारी पाहता विकासकामांच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील आठ आमदारांनी सुचविलेल्या एकूण ४५९ विकासकामांपैकी केवळ २४ कामे पेव्हर ब्लॉकची प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे एकेकाळी विकासनिधीतील केंद्रस्थानी असलेले पेव्हर ब्लॉकचे काम आता प्राधान्यक्रमाच्या तळाशी गेल्याचे चित्र समोर आले आहे.

Ladki Bahin Scheme : १४ हजार पुरुष झाले ‘लाडकी बहीण’; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

पेव्हर ब्लॉकच्या कामांमधून कंत्राटदारांना अधिक लाभ मिळत असल्याने या कामांना अनावश्यक प्राधान्य दिले जात असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये होती. याच पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी ‘आमदारांचा निधी पेव्हरमध्ये ब्लॉक’ हा विषयही जिल्ह्यात चर्चेचा ठरला होता. मात्र यंदाच्या निधी वाटपात आमदारांनी वेगळा दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा आणि पायाभूत विकासाच्या इतर कामांकडे निधी वळविण्याचा प्रयत्न यंदा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. रस्ते, नाली बांधकाम, संरक्षक भिंती, सभागृहे, शैक्षणिक सुविधा आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र अर्जांची फेरतपासणी होणार

विशेष म्हणजे, एकेकाळी प्रत्येक गावाच्या विकासकामांच्या यादीत हमखास दिसणारे पेव्हर ब्लॉकचे प्रस्ताव आता अपवादात्मक स्वरूपात दिसत आहेत. त्यामुळे आमदार निधीचा कल आता केवळ सौंदर्यीकरणाच्या कामांपेक्षा मूलभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकासकामांकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी काळात या बदलाचा ग्रामीण विकासावर कितपत परिणाम होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!