व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ladki Bahin Scheme : १४ हजार पुरुष झाले ‘लाडकी बहीण’; दोषींवर फौजदारी...

Ladki Bahin Scheme : १४ हजार पुरुष झाले ‘लाडकी बहीण’; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

14,000 men availed benefits under the Ladki Bahin scheme; demand raised for criminal cases : जावेद जकरिया यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Akola मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 14 हजार पुरुषांनी घेतल्याची बाब समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया Javed Zakria यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात जकरिया यांनी म्हटले आहे की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ हजारो पुरुषांनी घेतल्याची माहिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे शासन यंत्रणेत नेमक्या कोणत्या स्तरावर त्रुटी राहिल्या, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र अर्जांची फेरतपासणी होणार

महिलांसाठी असलेल्या योजनेचा लाभ पुरुषांना कसा मिळाला, अर्ज पडताळणी, ई-केवायसी (e-KYC), डेटा एंट्री तसेच निधी वितरण प्रक्रियेत कोणत्या स्तरावर हलगर्जीपणा झाला, याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे किंवा दिशाभूल करणारी माहिती सादर करून लाभ मिळविणाऱ्या पुरुषांकडून संबंधित रक्कम वसूल करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर व्यक्तींचे संगनमत आढळल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे जकरिया यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : खतटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कृषी विभागाने दिले ग्रामीण भागात खतपुरवठ्याचे आश्वासन

राज्याच्या तिजोरीतील जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही सूट देऊ नये. तसेच या प्रकरणाचा संपूर्ण चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करून पारदर्शकता राखावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!