व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sindkhedraja APMC : सिंदखेडराजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; सभापतीपदी उमेश शेजूळ...

Sindkhedraja APMC : सिंदखेडराजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; सभापतीपदी उमेश शेजूळ बिनविरोध

Mahavikas Aghadi establishes dominance in the Sindkhed Raja APMC : बाजार समितीतील सत्तांतराचा नवा अध्याय; उपसभापतीपदासाठी राहुल काबरा

Sindkhedraja कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत सभापतीपदी उमेश शेजूळ तर उपसभापतीपदी राहुल काबरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा पूर्ण झाल्यानंतर मावळते सभापती अनिल तुपकर यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे राजीनामा सादर केला. तसेच उपसभापती विष्णू मेहेत्रे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितोळे यांनी निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

Lonar lake : लोणार सरोवर वाढतंय की बदलतंय? वाढत्या जलपातळीमागील रहस्याचा शोध

निवडणुकीपूर्वी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश काळे यांनी सभापतीपदासाठी उमेश शेजूळ आणि उपसभापतीपदासाठी राहुल काबरा यांच्या नावांची घोषणा केली. या निर्णयाला सर्व संचालकांनी एकमताने पाठिंबा दर्शविल्याने दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही अर्ज दाखल झाले नाहीत.

अखेर दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी शितोळे यांनी उमेश शेजूळ यांची सभापतीपदी आणि राहुल काबरा यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

Shegao Municipal council : गटार योजनेच्या कामावरून शेगाव पालिकेत गदारोळ; सभापती-कंत्राटदार कर्मचाऱ्यांत वाद

यावेळी मावळते सभापती अनिल तुपकर, मावळते उपसभापती विष्णू मेहेत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, नगराध्यक्ष तायडे यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे बाजार समितीतील आगामी कारभाराची दिशा काय राहणार आणि स्थानिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!