व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mehkar Municipal Council : मेहकरमध्ये ‘हम साथ-साथ है’; काँग्रेसचे ७ नगरसेवक नॉट...

Mehkar Municipal Council : मेहकरमध्ये ‘हम साथ-साथ है’; काँग्रेसचे ७ नगरसेवक नॉट रिचेबल

Seven Congress councillors not reachable; speculation grows over a new political alliance in Mehkar Municipal Council : नगराध्यक्ष-उपाध्यक्ष एकाच मंचावर? मेहकर नगरपालिकेत नव्या राजकीय आघाडीची चर्चा

Mehkar मेहकर नगरपालिकेतील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्षांसह सात नगरसेवक काही काळ नॉट रिचेबल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले असून, नगरपालिकेतील नव्या राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत किशोर गारोळे हे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगरपालिकेतील पक्षीय बलाबलात काँग्रेसचे ११, शिंदे गट शिवसेनेचे ९ आणि उबाठा गटाचे ६ सदस्य निवडून आले होते. नगराध्यक्षपद उबाठा गटाकडे असले तरी नगरपालिकेतील निर्णय प्रक्रियेत काँग्रेस व शिंदे गटाचा प्रभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

नगराध्यक्षांना विकासकामांसाठी आवश्यक संख्याबळाचा अभाव असल्याने अनेक प्रस्तावांवर अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या शक्यतेवरही अधूनमधून चर्चा रंगत होती.

Sambhaji Brigade : ‘शेतकरी वाचवा, कर्जमाफी द्या’; नांदुऱ्यात अर्धनग्न आंदोलन

अशातच काँग्रेसचे उपाध्यक्षांसह सात नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय भूकंप झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. या नगरसेवकांनी सोशल मीडियावरील प्रोफाइलवर ‘आम्ही काँग्रेसचेच सदैव एकनिष्ठ’ असा संदेश ठेवल्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी रंग चढला. मात्र, ९ जून रोजी सकाळी हे सर्व नगरसेवक एकत्र दिसून आल्याने ‘हम साथ-साथ है’ची चर्चा सुरू झाली आणि अनेक अफवांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, या घडामोडींमागे केवळ विकासकामांचा अजेंडा आहे की भविष्यातील राजकीय रणनीती, याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या सात नगरसेवकांसह उबाठा गटाचे सहा सदस्य आणि नगराध्यक्ष एकत्र आल्यास नगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sanjay Gaikwad, Vijayraj shinde : गायकवाड-शिंदे संघर्ष न्यायालयात; १०० कोटींचा मानहानीचा दावा

मेहकरमधील बसस्थानक आणि पंचायत समितीच्या नव्या इमारतींच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पडद्यामागे नेमकी कोणती राजकीय रणनीती आखली जात आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सामान्य नागरिक मात्र या सर्व घडामोडींमधून शहराच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!