Bjp’s operation tiger successful, bawankule claims : सहा खासदारांनी व्हीप बजावूनही उद्धव ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ फिरवली
Nagpur अखेर शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी ठरले आहे. उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी पक्षाने आदेश (व्हिप) बजावल्यानंतरही बैठकीकडे पाठ फिरवल्याने ते आता उद्धव सेनेत राहिलेले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली आहे.
भाजपचे नेते या ऑपरेशनवर सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेताना दिसत आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या फुटीवर बोलताना मोठे भाष्य केले. सर्वच खासदारांना सत्तेसोबत राहून विकास करायचा असतो. विरोधात असताना काम करण्यावर काही मर्यादा येतात. आता जे खासदार उद्धव सेनेतून बाहेर पडले आहेत, त्यांच्या मतदारसंघात मोठा विकास होईल, असा दावा त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला.
Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’चा सस्पेन्स कायम; 21 जूननंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता
शिवसेनेचे खासदार फुटणार याची चर्चा कालपासूनच सुरू होती. याचा अंदाज आल्याने उद्धव सेनेच्या वतीने तातडीने पक्षाची बैठक दिल्ली येथे बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावण्यात आला होता. त्यामुळे या बैठकीला कोण आणि किती खासदार उपस्थिती लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीला फक्त तीनच खासदारांनी हजेरी लावली. बाहेर पडणार अशी चर्चा ज्या खासदारांच्या नावाची होती, त्यांपैकी एकही जण बैठकीला आला नाही.
काल या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बावनकुळे यांनी याचा आणि भाजपचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. उद्धव ठाकरे यांना सोडून जाणारे खासदार शिंदे सेनेत सहभागी होणार आहेत. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोणी कुठे जायचे, याचा निर्णय खासदारांना स्वतः घ्यायचा आहे. मात्र, आपले खासदार सोडून का जात आहेत, याचे आत्मचिंतन उद्धव ठाकरे यांनी करावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला होता.
Mlc election : प्रतिष्ठेच्या लढतींवर राज्याचे लक्ष; 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान
प्रत्यक्ष फूट पडल्यानंतर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आता तरी त्यांनी विचार करावा, असे ते म्हणाले. खासदार हे सहा विधानसभा आणि आठ ते दहा लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज भासते. विरोधात राहून विकास साधणे आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे शक्य होत नाही. हे पाहूनच उद्धव सेनेच्या खासदारांनी पक्ष सोडला असावा. ते सत्तेत सहभागी होणार असल्याने त्यांच्या मतदारसंघाचाही विकास होणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.








