व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : काँग्रेस सदस्यांचे पक्ष आदेश डावलून मतदान, तटस्थ राहण्याची घेतली...

Legislative election : काँग्रेस सदस्यांचे पक्ष आदेश डावलून मतदान, तटस्थ राहण्याची घेतली होती भूमिका

Despite adopting a neutral stance, Congress members voted in defiance of the party directive : सात मतदान केंद्रांवर चुरस, १०० टक्के मतदानाची नोंद; तिवसा ठरले अपवाद

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी (१८ जून) विक्रमी ९४.६८ टक्के मतदान झाले. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या मतदानात भाजपचे प्रवीण पोटे-पाटील, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद झाला. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने आपल्या सदस्यांना ‘तटस्थ’ राहण्याचा व्हिप जारी केला होता. मात्र, अमरावती शहरातील काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी पक्षादेशाला न जुमानता मतदान केल्याची चर्चा रंगली. ग्रामीण भागातही अनेक काँग्रेस सदस्यांनी व्हिपची पर्वा न करता मतदान केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद आणि महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला.

निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख तुलनेने कमी सक्रिय दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर पक्षाने घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Election commission : निवडणूक आयोगाचा नियम मोडला, काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा

अमरावती जिल्ह्यातील धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे येथील नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये १०० टक्के मतदानाची नोंद झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावल्याने या केंद्रांनी विशेष लक्ष वेधून घेतले.

माजी मंत्र्यांचा प्रभाव असलेल्या तिवसा नगर पंचायतीत सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. येथील सुमारे ११ काँग्रेस नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जिल्ह्यात तिवसा हे कमी मतदान झालेले केंद्र ठरले.

जिल्ह्यात मतदानासाठी एकूण सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणणे आणि परत नेणे यासाठी स्थानिक नेत्यांनी विशेष नियोजन केले होते. अनेक आमदार दिवसभर मतदारांच्या संपर्कात राहून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Sudhir mungantiwar : “900 मतदारांसाठी लाखो नागरिकांचा विकास रोखणे योग्य आहे का?” मुनगंटीवार यांचा सवाल

अमरावती शहरातील भातकुली आणि अमरावती तहसील या मतदान केंद्रांवर भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांनी भेट देत प्रतिनिधींकडून मतदानाचा आढावा घेतला. मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!