व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रतीक्षा कायम; आधी ग्रामपंचायत, दिवाळीनंतर...

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रतीक्षा कायम; आधी ग्रामपंचायत, दिवाळीनंतर जिल्हा परिषद?

Political parties to await the announcement of Zilla Parishad elections : राजकीय पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण; इच्छुकांची घालमेल, ग्रामीण राजकारणाला लागलाय ब्रेक

Akola लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतरही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत येत्या दोन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत लोकप्रतिनिधींमार्फत सरकारकडे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून या निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना अधिवेशनातून ठोस दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची?’ असा प्रश्न ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Mp vikas nidhi : विकास निधी मिळत नसल्याचा दावा फोल? कोट्यवधींचा निधी पडूनच

शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जनगणना प्रक्रिया आणि त्यानंतर मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे जुलैअखेरीस किंवा ऑगस्ट महिन्यात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Legislative election: विधान परिषद पराभवानंतर काँग्रेसमध्ये भूकंप: निरीक्षकांची चौकशी होणार, कारणांचा शोध घेण्यासाठी ‘समीक्षा समिती’ स्थापन

दुसरीकडे मतदार याद्यांचे पुनरीक्षण आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी वाढीव आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर दिवाळीपर्यंत या निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांनंतर दिवाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे राजकीय फटाके फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

error: Content is protected !!