District Central Cooperative Bank elections heat up the political atmosphere in Buldhana : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीने बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले
Buldhana जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. बँकेवरील सत्ता मिळविण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असून, आता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही या राजकीय समीकरणात सक्रिय सहभाग घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील दोन प्रभावी राजकीय गटांमधील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि प्रभावी नेत्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. विविध मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील नेत्यांशी वाढलेल्या संपर्कामुळे त्यांच्या राजकीय हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील बैठका आणि वरिष्ठ पातळीवरील संपर्कांमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
Trauma centre : ट्रॉमा सेंटरचे श्रेय घेण्यासाठी राजकीय रस्सीखेच; जाधव-खरात समर्थक आमनेसामने
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही सहकार क्षेत्रातील नेत्यांशी संवाद वाढविल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाशी असलेले त्यांचे राजकीय वजन लक्षात घेता, त्यांच्या सहभागामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील विद्यमान समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्यातील सहकार, कृषी आणि ग्रामीण राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानली जाते. त्यामुळे बँकेवरील नियंत्रणासाठी प्रत्येक राजकीय गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांमध्ये संपर्क, बैठका आणि रणनीती आखण्याचे काम सुरू असून, आगामी काळात राजकीय हालचाली आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत.
Prakash Ambedkar : जात कळेपर्यंत अभिजीत दीपके ‘जेन-झी’चे ‘डार्लिंग’ होते; प्रकाश आंबेडकरांचा दावा
सध्या राजकीय वर्तुळात दोन प्रमुख मते व्यक्त होत आहेत. काहींच्या मते, सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि स्थानिक नेटवर्कमुळे राजेंद्र शिंगणे यांचे पारडे जड राहू शकते. तर दुसरीकडे, केंद्र व राज्यातील सत्तेचा पाठिंबा आणि प्रतापराव जाधव यांची वाढती सक्रियता निवडणुकीचे गणित बदलू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.








