व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण District bank election : जिल्हा बँक निवडणुकीत ‘दादा’ फॅक्टर; आकाश फुंडकरांच्या भूमिकेकडे...

District bank election : जिल्हा बँक निवडणुकीत ‘दादा’ फॅक्टर; आकाश फुंडकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

all eyes on Akash Fundkar in District bank election : सहकाराच्या राजकारणात वाढली हालचाल; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी समीकरणे आकाराला

Khamgao बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. भेटीगाठी, गुप्त बैठका आणि ‘डिनर डिप्लोमसी’च्या माध्यमातून विविध गटांकडून पडद्यामागे नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षे शिंगणे घराण्याचा प्रभाव राहिला असून, त्यांचा राजकीय वारसा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे पुढे नेत आहेत. मात्र, गेल्या चौदा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीत झालेल्या बदलामुळे यंदाच्या निवडणुकीत नव्याने राजकीय गणिते मांडावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी रंगले मनपा राजकारण

दुसरीकडे, दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचाही जिल्हा बँकेशी जुना संबंध राहिल्याने त्यांच्या राजकीय वारशाचाही या निवडणुकीवर प्रभाव राहणार का, याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर कोणती भूमिका घेतात, कोणत्या गटाला पाठिंबा देतात आणि सहकाराच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे घडवतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, अधिकृत उमेदवारी, आघाड्या आणि गटबांधणीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगामी काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा सहकारासह जिल्ह्याच्या राजकारणासाठीही प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!