व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी...

Akola Municipal corporation : स्थायी समितीतील गोंधळामागे मागास वस्ती निधीचे राजकारण?; आरोप-प्रत्यारोपांनी रंगले मनपा राजकारण

Politics over funds for backward settlements behind the chaos in the Standing Committee : मंजूर झालेल्या २२.५० कोटी रुपयांच्या निधीत कपात झाल्याच्या आरोपानंतर प्रकरण चिघळले

Akola महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेतील गोंधळामागे मागास वस्ती सुधार योजनेच्या निधीचे राजकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे. मागास वस्तींसाठी मंजूर झालेल्या २२.५० कोटी रुपयांच्या निधीत कपात झाल्याचा आरोप नगरसेवकीचे पती तथा समाजसेवक गजानन कांबळे यांनी केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आहे.

कांबळे यांनी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यावर निधी वाटपात अन्याय केल्याचा आरोप करत, जाब विचारण्यासाठी सभागृहात गेल्यानंतर त्यांच्याकडून अर्वाच्य भाषेचा वापर झाल्याचाही दावा केला आहे. दुसरीकडे, या आरोपांवर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला सभेत अशा प्रकारे प्रवेश करता येत नसल्याने त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली होती असं दवा केला आहे.

BJP Amravati : कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले, बदलामागील कारण गुलदस्त्यात

या प्रकरणानंतर मागास वस्ती विकासासाठी मंजूर झालेल्या निधीच्या वाटपावरून मनपा राजकारण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शासनाने मंजूर केलेला संपूर्ण निधी मागास वस्तींसाठी खर्च करावा, अन्यथा महानगरपालिकेसमोर ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.

Jaljeevan Mission : आधी काम पूर्ण करा, मगच शांत बसू… देऊळगाव महीत टाकीवर चढले ग्रामस्थ

दरम्यान, स्थायी समिती सभेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे मनपाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागास वस्ती निधीच्या वाटपाबाबत प्रशासन आणि सत्ताधारी भूमिका स्पष्ट करणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!