व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray: नागपुरात ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून राजकीय वाद; रामनगर मंदिराचा नकार, आता...

Uddhav Thackeray: नागपुरात ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून राजकीय वाद; रामनगर मंदिराचा नकार, आता पर्यायी जागेचा शोध सुरू

Temple management refuses Shivsena permission to use the Ram Temple for the Ram Raksha agitation : मंदिराचा राजकीय वापर होऊ देणार नाही, व्यवस्थापनाची भूमिका

Nagpur अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे.

मुंबईत आंदोलन केल्यानंतर, आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरात हे आंदोलन करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे.

या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होणार असून, नागपुरातील प्रसिद्ध रामनगर राम मंदिरात सामूहिक ‘रामरक्षा पठण’ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, रामनगर मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी या राजकीय कार्यक्रमाला आणि आंदोलनाला मंदिरात परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

District Mineral Foundation – DMF : पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदांची पुनर्रचना; शासनाचे स्वतंत्र जीआर

मंदिराचा वापर राजकीय हेतूंसाठी किंवा घोषणाबाजीसाठी करू दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका व्यवस्थापनाने घेतली आहे.
रामनगर मंदिराकडून नकार मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाने नागपुरात पर्यायी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी आता रेल्वे स्टेशनजवळील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिर आणि हनुमाननगर येथील ऐतिहासिक राजाबक्षा मंदिराचा पर्याय विचारात घेतला जात आहे.

Sudhir mungantiwar : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करा, मुनगंटीवारांचे सरकारला पत्र

आंदोलनाची जागा निश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे स्वतः नागपुरात येत असून, ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जागेवर शिक्कामोर्तब करणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवणे आणि सत्ताधाऱ्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांना घेरून राजकीय आव्हान देणे, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या नकारानंतर आता ठाकरे गटाचे हे आंदोलन नागपुरात कुठे आणि कसे पार पडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!