व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक...

Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक करणार रामरक्षा पठण

Uddhav Thackeray to lead Ram Raksha recitation in Nagpur with 8,000 Shivsainiks : रामनगरातील राम मंदिरात शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण

Nagpur अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या बालेकिल्ल्यात धडकणार आहे. येत्या शनिवारी (ता. १८) नागपूरच्या रामनगरातील राम मंदिरात सुमारे ७ ते ८ हजार शिवसैनिक एकत्र येऊन ‘रामरक्षा’ पठण करणार आहेत. या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाद्वारे विदर्भात ‘भगवे वादळ’ निर्माण करण्याचा संकल्प उद्धव सेनेने केला असून, स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण नागपूर शहर ‘भगवामय’ करून शिवसेना आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. सुरुवातीला हा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत राम मंदिर प्रशासनाने याला परवानगी नाकारली होती. मात्र, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी नागपुरात दाखल होत मंदिर प्रशासनाशी थेट चर्चा केली. हा कार्यक्रम राजकीय नसून पूर्णपणे धार्मिक आहे, हे त्यांनी प्रशासनाला पटवून दिल्यानंतर अखेर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली. नियोजित कार्यक्रमानुसार, मंदिराच्या आत उद्धव ठाकरे आणि मोजके प्रमुख पदाधिकारी रामरक्षा पठण करतील, तर मंदिरासमोरील मैदानावर उभारण्यात येणाऱ्या भव्य मंचावरून हजारो शिवसैनिक एकाच वेळी एकाच आवाजात रामरक्षा पठण करणार आहेत.

High Court D : उघड्यावर थुंकणे पडणार महागात! हायकोर्टाचे कडक आदेश

यावेळी उपस्थित राहणाऱ्या सर्व शिवसैनिक आणि नागरिकांना रामरक्षेच्या पुस्तिकेचे मोफत वाटप केले जाणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव सेनेने भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात राजकीय आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. या कार्यक्रमात केवळ शिवसैनिकच नव्हे, तर काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या सर्वपक्षीय सहभागामुळे नागपुरातून महाविकास आघाडीची वज्रमुठ अधिक मजबूत केली जाणार आहे.

Freeb seeds : दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे ६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा विदर्भात आले होते, तेव्हा नागपूर विमानतळावर त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले होते. नागपूरमधील शिवसैनिकांचा तोच उत्साह आणि गर्दी पाहून उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठणाचा हा मुख्य आणि भव्य कार्यक्रम नागपुरातच घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी १० वाजताच नागपूर विमानतळावर दाखल होणार असून, दुपारी ३:३० वाजता रामरक्षेचा कार्यक्रम आटोपून ते मुंबईकडे रवाना होतील.

error: Content is protected !!