व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र NEET paper leak: सरसंघचालकांचा मोदी सरकारला घरचा आहेर; नीट आंदोलनावरून कान टोचत...

NEET paper leak: सरसंघचालकांचा मोदी सरकारला घरचा आहेर; नीट आंदोलनावरून कान टोचत सुचवला मोलाचा मार्ग

RSS chief Mohan Bhagwat advices Modi government to solve the paper leak issue having dialogue with protestors : सरकारचे टोचले कान, संवादातून प्रश्न सोडवण्याचा सल्ला

Nagpur दिल्लीत नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कोणतीही चर्चा न करता परस्पर निर्णय घेणे आणि त्यांच्यावर लाठीमार करून हुसकावून लावल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात देशभरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या सर्व वादानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कान टोचले असून, कुठल्याही समस्येवर चर्चा करणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांसोबत चर्चेद्वारे त्वरित तोडगा काढण्याचे सुचवले आहे.
नीट पेपर फुटीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत तब्बल २६ दिवस उपोषण करणारे पर्यावरण व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी अखेर आपले उपोषण सोडले आहे.

Sonam Wangchuk : २६ दिवस उपोषण केल्यानंतरही प्रामाणिकता सिद्ध करावी लागते?

दुसरीकडे, या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारने धडाक्यात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पेपर फुटीच्या चौकशीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा मंजूर करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार, पेपर फुटीमध्ये सामूहिक सहभाग आढळल्यास थेट १० वर्षांच्या शिक्षेची कठोर तरतूद करणारे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. सरकारने कितीही कठोर कायदे केले तरी, या संपूर्ण प्रक्रियेस केंद्र सरकारने फार उशीर केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारने आधीच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून चर्चा केली असती, तर हे आंदोलन इतके चिघळलेच नसते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही सरकारवर कडाडून टीका केली होती. चर्चा करायला सरकारची काय हरकत आहे असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. यापूर्वी शेतकरी आंदोलना वेळीही चर्चा करण्यास नकार दिल्यामुळे ते आंदोलन अधिक चिघळले होते, अगदी तीच पुनरावृत्ती आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही सरकारकडून करण्यात आली, असे राज ठाकरे म्हणाले होते. रात्री-बेरात्री व्हिडिओ प्रसारित करणे आणि सोशल मीडियावर ट्विट करण्यापेक्षा थेट पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसोबत समोरासमोर चर्चा केली असती, तर हा प्रश्न केव्हाच निकाली निघाला असता, असा सूर उमटत होता.

Devendra Fadnavis : ‘मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत’

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता नीट आंदोलनाबाबतही केंद्र सरकारने संवाद साधण्यात दाखवलेला आढेवेढा सरकारसाठी अडचणीचा ठरत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीसुद्धा थेट चर्चेचा मार्ग पत्करण्याचा मोलाचा सल्ला दिल्याने, मोदी सरकारवर हा पेच लवकरात लवकर सोडवण्याचे मोठे नैतिक दडपण आले आहे. सरसंघचालकांच्या या भूमिकेमुळे सरकारला आता आंदोलक विद्यार्थ्यांसोबत पावले उचलत हा विषय तातडीने संपवावाच लागेल, असे मानले जात आहे.

error: Content is protected !!