Prakash ambedkar puts one week ultimetum before Modi government : मंत्री, खासदारांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
Mumbai केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका आठवड्याच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा मंत्री आणि खासदारांच्या घरांसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड दम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भरला आहे. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि हे सरकार जनरल डायरचे सरकार असल्याचा घणाघाती आरोप केला. बिहार निवडणुकीचा बाराकाईने अभ्यास करा यात प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर दडले असल्याचेही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आपली मागणी हे सरकार मान्य करणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अधिक आक्रमक व्हावे लागले. त्यामुळे आधी आपण सरकारला विनंती करू की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. ते केले नाही, तर आठवड्याभराच्या आत सर्व नेते, मंत्री आणि खासदारांच्या आंदोलन केरा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत एका आठवड्यात राजीनामा घेण्याची मागणी लावून धरली.
सरकार अडचणीत आले असताना आणि सर्वच स्तरावर मागणी दाबाव वाढत असतानाही प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही याचे कारण काय अशी विचारण केली असता प्रकाश आंबेडकर यांनी बिहार निवडणुकीचा अभ्यास करण्याचा सल्ला माध्यमांना दिला. ज्याला कोणाला याचे उत्तर शोधायचे असेल, त्यांनी शोध पत्रकारिता करावी. बिहारच्या निवडणुकीचे कनेक्शन शोधा. त्यातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेऊ शकत नाही, याची उत्तरे तुम्हाला तिथे मिळतील असेही आंबेडकर म्हणाले.
Rahul Gandhi: सरकारला सर्व बंद करता येते, पण पेपर फूट नाही; राहुल गांधींचे मोदी सरकारवर बोचरे ट्विट
आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत देत जंतरमंतर हे आंदोलनाचे मुख्य सेंटर ठेवा आणि खासदार, मंत्र्यांचे घर हे सबसेंटर ठेवा असे ते म्हणाले. या आंदोलनाची दिशा ठरवताना अभिजित दीपके यांना संदेश पाठवण्यात आला असून, हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय ठेवण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. आजा सर्वच विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आ. प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने आणि पद्धतीने आंदोलने करीत आहेत. मात्र हे आंदोलन भरकटू नये याठी कॉक्रोज जनता पार्टीने एक अजेंडा ठरवला पाहिजे. आंदोलनाची रुपरेषा आखली पाहिजे, त्याकरिता सर्वच पक्षांसोबत चर्चा करावी. त्यामुळे आंदोलना अधिक धार येईल तसेच एकत्रित दबावाचा अधिक प्रभाव पडेल, असेही आंबेडकर यांनी सुचवले आहे.








