Sanjay Raut advices Mohan Bhagwat to demand resignation : नीट पेपर फुटीवरून संजय राऊतांचा सरसंघचालकांना सल्ला
Mumbai दिल्लीत नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीवरून पेटलेल्या आंदोलनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सरकार जाणीवपूर्वक वाचवत असल्याचा आरोप करत, नीट पेपर फुटीला प्रधान हेच मुख्य जबाबदार आहेत आणि त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.
या प्रकरणी केवळ अप्रत्यक्ष कान टोचून चालणार नाही, असे सांगत संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेवरही भाष्य केले. मोहन भागवत यांनी आता केवळ प्रवचने देण्याऐवजी थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला हवा. मोदींना सांगा, तुम्ही आणि त्यापूर्वी प्रधानांना पदावरून घालवा. आता प्रवचने देण्याची वेळ नाही, आम्ही तुमचा आदर करतो आणि प्रवचने ऐकतच असतो, अशा शब्दांत राऊतांनी सरसंघचालकांना थेट भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे विरोधकांना भेटत होते आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करत होते म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लावला, मग प्रधानांनाच का वाचवले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Rahul Gandhi: सरकारला सर्व बंद करता येते, पण पेपर फूट नाही; राहुल गांधींचे मोदी सरकारवर बोचरे ट्विट
सध्या वातावरण अत्यंत गंभीर झाले असून काही अगतिक घडू नये म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार व खासदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, यावरही राऊतांनी उपरोधिक टोमणा मारला. तुमच्या सर्वांवर लक्ष आहे, खासदारांनी दिल्लीत जाऊ नये म्हणून सुरक्षेत वाढ केली जात आहे. प्रसंगी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता मिलिट्रीसुद्धा बोलवा, असा खोचक टोमणा त्यांनी लगावला. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांची लढाई अत्यंत चाणाक्ष पद्धतीने सोशल मीडियाचा आधार घेऊन लढली जात असल्याचे कौतुक करत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले.
Devendra Fadnavis : ‘मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत’
इराणच्या तरुणांनी सायबर सेलचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलच्या नाकीनऊ आणले, तर दुसरीकडे मोदी सरकार आता आपल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर करा, असे सांगत आहे. मात्र, “अनेक मंत्री अर्धशिक्षित आहेत, ते इन्स्टाग्राम कसे वापरणार? असा सवाल करत त्यांनी मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या सरकार पूर्णपणे गोंधळले असून, देश अडचणीत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी खुर्चीवर राहू नये, अशी मागणी करत राऊतांनी या संघर्षात अधिकच धार आणली आहे.








