NEET exam paper leaked in Maharashtra, Rohit pawar claims : व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर व्हायरल करण्यात आल्याचा दावा
Pune शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत मोठा दावा करत नीटचा पेपर महाराष्ट्रातूनच फुटल्याचा आरोप केला आहे. तसेच एमपीएससीच्या औषध निरीक्षकाचा पेपर नंदूरबारच्या ‘कौटिल्य अकॅडमी’मधून २० ते ३० लाख रुपये घेऊन फोडल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
हा पेपर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर व्हायरल करण्यात आला असून, पूर्ण पेपर फुटला नसला तरी ९० टक्के प्रश्न कौटिल्य अकादमीच्या विद्यार्थ्यांना आधीच देऊन त्यांचा सराव करून घेण्यात आला होता; पेपर सेट करणाऱ्यानेच हा पेपर फोडल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले. केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारलाही सरळ करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीने ज्या प्रकारे केला, त्यावरून आता आमचा सीआयडीवर विश्वास नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !
एमपीएसीच्या कार्यालयात जाणार आहे. अध्यक्षाची भेट घेणार आहोत. ते वेळ देतील की नाही मला माहिती नाही. ऑन लाईन परीक्षेवर आमचा आक्षेप आहे. एकाच दिवशी सर्व परीक्षा घेता येत नाही. टप्प्याटप्प्याने परीक्षा घ्यावी लागते. एकाच परीक्षेचा पेपर फुटत असेल तर इतर परीक्षेचे पेपरही फुटू शकतात. स्पर्धा परीक्षा या ऑफ लाईनच घेतल्या जावा. 10 दिवसात हा घोळा शोधला नाही आणि निकाल जाहीर केला तर एमपीएससीला महागात पडेल असाही इशारा रोहित पवार यांनी दिला. ऑन लाईन परीक्षेच्या विरोधात आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे सांगताना नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला सरळ केले यानंतर आम्ही महाराष्ट्र सरकारलाही सरळ करू असाही इशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.








