व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar birthday : विकासासोबत माणुसकीचा स्पर्श… आरोग्यसेवेतून जनतेच्या विश्वासाचा आधार बनलेले...

Sudhir mungantiwar birthday : विकासासोबत माणुसकीचा स्पर्श… आरोग्यसेवेतून जनतेच्या विश्वासाचा आधार बनलेले आ. सुधीर मुनगंटीवार

Sudhir mungantiwar strengthen health services in Chandrapur district: सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम

लेखक – डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे

रुग्णालयाच्या दारात उभ्या असलेल्या गरजू माणसाला विकासाच्या मोठमोठ्या घोषणा नव्हे, तर वेळेत मिळणारा उपचार महत्त्वाचा वाटतो. एखाद्या कुटुंबासाठी तो उपचार म्हणजेच नवजीवनाची आशा असते. या सामान्य माणसाच्या वेदना ओळखून आरोग्यसेवेला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारे नेतृत्व विरळाच असते. विकासाला माणुसकीची जोड देत आरोग्याला लोकसेवेचे सर्वोच्च माध्यम मानणारे असे नेतृत्व म्हणजे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवे रूप लाभले असून, ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी घडवून आणले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी त्यांनी मंत्री असताना सर्वसमावेशक नियोजन केले. त्यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात १४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३२ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, कळमना येथील ₹२.६८ कोटींचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, उमरी पोतदार येथे प्रधानमंत्री खनिज कल्याण योजना व जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून साकारलेले सुमारे ₹१० कोटींचे आधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल, विशेष बाब म्हणून मंजूर झालेले मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल कॉलेज, आणि नुकतेच चंद्रपूर येथे बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. तसेच यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी एमआरआय मशीनसाठी ₹७.५० कोटींचा निधी, मोबाईल कॅन्सर व्हॅन, मोफत नेत्रतपासणी व आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका सेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या.

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा सेवामय; ३० जुलैला समाजोपयोगी उपक्रमांचा महोत्सव!

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट आरोग्य केंद्रांचे व्यापक जाळे उभे केले. सावली तालुक्यातील जीबगाव, राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन, वरोरा तालुक्यातील सावरी बिड व शेगाव, ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी व नान्होरी, चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी, कोरपना तालुक्यातील नांदा, जिवती तालुक्यातील शेणगाव, गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी आणि पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार अशा विविध भागांत स्मार्ट आरोग्य केंद्रे साकार करून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ दिले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे शहरापासून दुर्गम ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवेचे जाळे उभे राहिले आणि ‘आरोग्यदायी चंद्रपूर’ हा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात साकार झाला.

आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे ₹२८० कोटींचे, चंद्रपूर येथील १४० खाटांचे पंडित दीनदयाल उपाध्याय टाटा कर्करोग रुग्णालय. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील कर्करोग रुग्णांना नागपूर-मुंबईची धावपळ कमी झाली असून अत्याधुनिक उपचार सुविधा चंद्रपुरातच उपलब्ध झाल्या आहेत.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेलाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. विधानसभेत सर्वायकल कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. मोफत नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, रुग्णवाहिका सेवा, दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकली आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

District bank election : जिल्हा बँक निवडणुकीत २८ अर्ज बाद; माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट

त्यांच्या कार्याची खरी ओळख मात्र प्रकल्पांपेक्षा संकटातील माणसाच्या पाठीशी उभे राहण्यात आहे. मध्य प्रदेशातील तीन वर्षीय चिमुकलीच्या उपचारासाठी नागपूर एम्समध्ये यशस्वी शस्त्रक्रिया घडवून आणणे, जन्मतः श्रवणदोष असलेल्या आराध्या वाघमारेच्या कॉक्लियर इम्प्लांटसाठी पुढाकार घेणे, गंभीर रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे, अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करणे अशा असंख्य घटनांमधून त्यांनी लोकप्रतिनिधीपदाचा मानवी चेहरा जपला आहे.

आषाढी पंढरपूर वारी २०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरूर खटी येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून पिंपळकर कुटुंबाला ₹४ लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता, शासनाची मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची कार्यशैली यातून पुन्हा अधोरेखित झाली.

आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरमध्ये डॉक्टर, मनुष्यबळ आणि औषधांचा पुरवठा वाढविण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला

आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या ध्यासातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित विविध आरोग्य शिबिरांमधून आजपर्यंत ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण, तर १५ हजारांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात आल्या आहेत. हजारो नागरिकांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची किरणे पोहोचविणारा हा उपक्रम त्यांच्या जनसेवेप्रती असलेल्या संवेदनशील बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

विकास, शिक्षण, उद्योग आणि पर्यावरणाइतकाच आरोग्य हा लोकसेवेचा केंद्रबिंदू मानणारे सुधीर मुनगंटीवार यांनी उभारलेले आरोग्य प्रकल्प, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या सुविधा आणि संकटात आधार मिळालेली हजारो कुटुंबे हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सर्वात मोठी ओळख आहे. विकासासोबत माणुसकीचा स्पर्श जपत जनतेच्या विश्वासाचा आधार बनलेले हे कार्यच त्यांच्या लोकनेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.

Property tax hike :वाढीव मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचा एल्गार; विशेष सभेची अधिकृत मागणी

जनतेच्या आरोग्यसेवेसाठी आपण घेतलेला अथक पुढाकार आणि माणुसकी जपणारी लोकसेवा अशीच अखंड सुरू राहो. जनकल्याणाच्या या कार्यासाठी ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक ऊर्जा प्रदान करो. आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे
MBBS MS
(ENT & HEAD NECK SURGERY )

(कान नाक घसा तज्ञ व Nasal इंडॉस्कॉपीक सर्जन व रिलेटेड कॅन्सर सर्जन)

error: Content is protected !!