व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vanchit Bahujan Aghadi election : अर्ध्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अकोल्याचा कौल...

Vanchit Bahujan Aghadi election : अर्ध्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अकोल्याचा कौल राजेंद्र पातोडेंकडे

Akola votes in favour of Rajendra Patode in Vanchit bahujan aghadi election : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची निवडणूक

Akola वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नोंदणीकृत ३०४८ मतदारांपैकी १४६० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ४७.९० इतकी नोंदविण्यात आली.

अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष आणि १२ प्रदेश कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रावर दिवसभर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांची मोठी गर्दी होती.

Eknath Shinde : काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट

राज्यात सर्वाधिक नोंदणीकृत मतदार अकोला जिल्ह्यात असल्याने या मतदानाकडे विशेष लक्ष लागले होते. मतदान प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असून, त्यामध्ये राजेंद्र पातोडे हे अकोलेकर आहेत. तसेच चळवळीतील त्यांचे जुने सहकारी असल्याने अकोला जिल्ह्यातील बहुतांश मतदारांचा कल त्यांच्याकडे असल्याची चर्चा मतदानादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये होती.

निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद इंगळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रदीप सावे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. उद्या, रविवारी मुंबईत मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

error: Content is protected !!