व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका; काही तासातच अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका; काही तासातच अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Joint inspection by officials and BJP workers in flood-affected areas following Sudhir Mungantiwar’s directive : मुनगंटीवारांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त पाहणी; पंचनाम्यांना वेग

Chandrapur जिल्ह्यातील पूरस्थितीची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला तातडीने मैदानात उतरवले. त्यांच्या स्पष्ट सूचनेनंतर महसूल प्रशासन आणि भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

या पाहणी दौऱ्यात तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसीलदार संदीप पानमंद, संबंधित तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, बल्लारपूर तालुकाध्यक्ष पिंटू देऊळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल मोरे, राजू बुद्धलवार, सुनील फरकडे, संतोष लोनगाडगे, गणेश टोंगे तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Sudhir mungantiwar birthday : विकासासोबत माणुसकीचा स्पर्श… आरोग्यसेवेतून जनतेच्या विश्वासाचा आधार बनलेले आ. सुधीर मुनगंटीवार

जिल्ह्यातील पूरस्थितीची गंभीर दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व मदत-पुनर्वसन विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुनगंटीवारांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी करत असल्याने पंचनाम्यांच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

या संयुक्त पाहणीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत शासनापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी झाली असून, पात्र शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

एकही पूरग्रस्त शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे व प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत शासनाची मदत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांच्या या पुढाकारामुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळेल आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!