Girls’ toilets without doors, no beds for students; poor state of tribal ashram schools exposed : कोट्यवधींचा निधी घेणाऱ्या शाळांना सुविधा का देता येत नाहीत, अभिजित दीपकेचा हल्लाबोल
Chandrapur नीट परीक्षा आंदोलनानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजित दीपके यांनी आपला मोर्चा थेट आदिवासी आश्रमशाळांकडे वळवला असून, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय शाळांची धडक तपासणी केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री हेच चंद्रपूरचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील शाळांची दुर्दशा पाहून दीपके यांनी सरकारला थेट जाब विचारला आहे.
बाबा आमटे यांच्या संस्थेला शाळांना सर्व सुविधा देणे जमते, मग कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणाऱ्या शासकीय आश्रमशाळांना ते का जमत नाही? हा निधी नक्की जातो कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना दीपके यांनी शाळांमधील धक्कादायक वास्तव उघड केले. गडचिरोलीतील शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांना दारे आणि वर छप्परही नसल्याचे उघडकीस आले आहे. सर्पदंशाच्या भयंकर घटना घडल्यानंतरही अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पलंग मिळालेले नाहीत; चिमुकल्यांना आजवर जमिनीवरच झोपावे लागत आहे. त्यातच एका शाळेत मुख्याध्यापकच दारू पिऊन येत असल्याची गंभीर तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईचे आश्वासन घेण्यात आले आहे.
Dattatray bharane: शेतकऱ्यांची पिके करपली अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांना काजू-बदामाचा पाहुणचार!
चंद्रपूर जिल्ह्यातील ५५ शाळांची पाहणी करताना काही शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसले असले, तरी एकंदरीत अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. शासन प्रतिविद्यार्थी २,२०० रुपये खर्च करत असतानाही ही बिकट परिस्थिती कायम आहे. हीच भयानक अवस्था मुंबई किंवा बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांत असती, तर देशात मोठा गदारोळ माजला असता आणि तो राष्ट्रीय मुद्दा बनला असता. मात्र गडचिरोली व चंद्रपूर हा दुर्गम आदिवासी भाग असल्याने प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही, असा संतप्त सवाल दीपके यांनी केला. आदिवासी मुलांमध्ये मोठी क्षमता असून त्यांना तातडीने दर्जात्मक मूलभूत सुविधा पुरवण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.








