व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dayashankar tiwari : दयाशंकर तिवारींचा प्रफुल गुडधेंवर १ कोटींचा मानहानीचा दावा; ४८...

Dayashankar tiwari : दयाशंकर तिवारींचा प्रफुल गुडधेंवर १ कोटींचा मानहानीचा दावा; ४८ तासांत जाहीर माफी मागण्याचा अल्टिमेटम

Dayashankar Tiwari files a ₹1 crore defamation suit against Praful Guddhe; gives a 48-hour ultimatum to issue a public apology : आर्थिक आरोप आणि ‘अंडरस्टँडिंग’बाबतचे वक्तव्य निराधार असल्याचा दावा

Nagpur भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलत एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. प्रफुल गुडधे यांनी आपल्यावर केलेले आर्थिक आरोप आणि ‘अंडरस्टँडिंग’बाबतचे वक्तव्य निराधार असून, ४८ तासांच्या आत जाहीर माफी न मागितल्यास न्यायालयात दावा दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा तिवारी यांनी दिला आहे.

प्रफुल गुडधे यांनी एक व्हीडीओ प्रसारित केला आहे. त्यात ते दयाशंकर तिवारी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करताना दिसत आहे. पंडित दयाशंकर तिवाही हे खुप विद्वान आहेत. तिवारी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना आपण सदस्य होते.

Market Cess : मार्केट सेसविरोधात एल्गार; ११०० कोटींच्या महसुलावर संकट

त्यामुळे त्यांचे व्यवहार मला चांगलेच ठावूक आहे असे सांगताना प्रफुल गुडधे यांनी नोटा मोजतानाचा एक व्हीडीओ सध्या नागपूरमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त करत दयाशंकर तिवारी म्हणाले, मी काय आहे आणि माझी कार्यशैली काय आहे, हे प्रत्येक नागपूरकराला चांगले माहीत आहे. माझ्यावर विनाकारण खोटे आणि आर्थिक आरोप करण्यात आले आहेत. गुडधे यांनी हे आरोप सिद्ध करावेत किंवा ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा मी त्यांच्यावर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणारच.”

Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची चाहूल?

यावेळी तिवारी यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. पंकजा मुंडे यांना ऑफर देण्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, चांगले आहे, मात्र काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची ताकद उरली आहे का? मुख्यमंत्री करण्यासाठी आमदार हवे असतात. आज महायुतीमधील तीनही पक्षांकडे मिळून जेवढे आमदार आहेत, तेवढे एकट्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने ख्याली पुलाव बनवणे आता थांबवावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस दिल्लीत जाणार नाही. आगामी विधानसभेची निवडणूक आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचा दावाही यावेळी दयाशंकर तिवारी यांनी केला.

error: Content is protected !!