व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही; मानोरा आरोग्य केंद्राच्या...

Sudhir Mungatiwar : रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही; मानोरा आरोग्य केंद्राच्या तक्रारीवर मुनगंटीवारांची तात्काळ ॲक्शन

Mungantiwar Takes Immediate Action Following Citizens’ Complaints About Manora Health Centre : नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित भेटीचे निर्देश; काही तासांतच प्रत्यक्ष पाहणी

Chandrapur : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची आपली संवेदनशील कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित करत भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. अशोक कटारे यांना तातडीने मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले. आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर काही तासांतच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना व निर्देश दिले.

यावेळी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची व्यथा मांडली होती. ही बाब समजताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोणताही विलंब न करता प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही

आ. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. कटारे यांनी मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थिती, आरोग्य सेवा, रुग्णांना उपलब्ध सुविधा आणि कामकाजाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा अधिक जबाबदारीने आणि नियमितपणे देण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, आरोग्य व्यवस्थेतील कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही सातत्याने घेतली आहे. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर तत्परतेने प्रतिसाद देत प्रशासनाला त्वरित कार्यवाहीस भाग पाडण्याची त्यांची कार्यपद्धती या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

error: Content is protected !!