व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : शब्द दिला… आणि अवघ्या २४ तासांत मुनगंटीवारांनी कृतीत उतरवला!

Sudhir Mungatiwar : शब्द दिला… आणि अवघ्या २४ तासांत मुनगंटीवारांनी कृतीत उतरवला!

A Promise Made… and Delivered by Mungantiwar Within Just 24 Hours : चुनाभट्टीत भजन मंडळाला साहित्य, दोन लकवाग्रस्त रुग्णांना व्हीलचेअर देत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा संवेदनशीलतेचा प्रत्यय

Chandrapur : जनतेच्या अडचणी ऐकून केवळ आश्वासन देणे नव्हे, तर त्याची तातडीने पूर्तता करणे हीच आपली कार्यशैली असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. चुनाभट्टी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक भजन मंडळाने भजनासाठी आवश्यक साहित्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांच्या आत भजन मंडळाला संपूर्ण भजन साहित्य उपलब्ध करून देत आ. मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला. त्यामुळे भजन मंडळाच्या सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आ.मुनगंटीवार यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक बांधिलकीचे आणखी एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. अन्वर शेख आणि रामदास गेडाम हे लकवाग्रस्त रुग्ण हालचालींमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करत असल्याची माहिती मिळताच, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना तात्काळ व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या. या मदतीमुळे दोन्ही रुग्णांच्या दैनंदिन जीवनाला मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबीयांनी भावूक होत आभार व्यक्त केले.

Tukaram Mundhe : ‘सावजी मटण खाऊ नका’ असे मी म्हटलेच नाही

वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा स्वीकारण्यात न घालवता, लोकांच्या गरजा ओळखून त्यांची त्वरित पूर्तता करण्याचा संदेश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कृतीतून दिला. एका बाजूला धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमाला बळ देणारे भजन साहित्य, तर दुसऱ्या बाजूला गरजू रुग्णांना दिलासा देणाऱ्या व्हीलचेअरचे वाटप अशा दुहेरी समाजोपयोगी कार्यामुळे चुनाभट्टी परिसरात त्यांच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आली.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

नागरिकांनी केलेल्या मागणीची अवघ्या २४ तासांत पूर्तता करून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या तात्काळ निर्णयक्षमतेची आणि जनसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. “आश्वासन नव्हे, कृतीतून उत्तर; अवघ्या २४ तासांत मागणीची पूर्तता!” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक केले.

error: Content is protected !!