Councillors’ entry into Shinde Sena hits Congress hard; major setback for the Amravati district Congress : नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश काँग्रेसच्या जिव्हारी; जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का
Amravati दर्यापूर नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांच्यासह काँग्रेसच्या १९ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केल्याने अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांतरावर काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित नगरसेवकांना खुले आव्हान दिले आहे.
‘दम असेल तर नगरसेवकपदाचे राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा,’ असे आव्हान यशोमती ठाकूर यांनी दिले. संबंधित नगरसेवकांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि जनतेने काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले, असा दावा त्यांनी केला.
Sajid Khan Pathan : ‘मीदेखील काँग्रेसचा कार्यकर्ता’ म्हणत आमदाराचे एकजुटीचे आवाहन
दर्यापूर नगरपालिकेत काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र, आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गडाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Sameer Wankhede : ‘तुकाराम मुंढे फार काही वेगळं काम करत नाहीत’
दर्यापूरमधील या राजकीय घडामोडीमुळे आता आमदार बच्चू कडू विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आगामी काळात या पक्षांतराचे जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे लक्ष लागले आहे.








