व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mohan Bhagwat On Muslim : ‘भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू कदाचित...

Mohan Bhagwat On Muslim : ‘भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू कदाचित हिंदू नसेल’

mohan-bhagwat-on-muslim-new-york-universal-oneness-celebration-hindu-muslim-statement : न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

New York : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘एक जग, एक मानवता’ या कार्यक्रमात भारतातील धार्मिक विविधता आणि मानवतेच्या एकतेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ‘भारतात एकही मुस्लीम नको, असे म्हणणारा हिंदू कदाचित हिंदू नसेल,’ असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. सर्व धर्मांचा आदर आणि मानवतेची एकता हीच हिंदू विचारधारेची मूलभूत भूमिका असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जगभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भागवत यांनी भारताच्या सांस्कृतिक विचारधारेची भूमिका मांडली. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात धर्म आणि मानवता यांच्यातील संबंध स्पष्ट केला. धर्मांचे मार्ग आणि धार्मिक पद्धती वेगवेगळ्या असू शकतात; मात्र मानवता एकच आहे, असे त्यांनी सांगितले. सत्य एकच असून, विविध समाज आणि धर्म आपल्या अनुभवांनुसार त्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करतात, असेही त्यांनी नमूद केले.

Supriya Sule : ‘राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा होता, आजही आहे आणि…’

याच विचाराच्या पार्श्वभूमीवर भारतातील मुस्लिमांच्या अस्तित्वाबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. भारतात मुस्लिम नसावेत, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्तीच्या हिंदू म्हणून असलेल्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे भागवत म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे हे मानवतेचे मूलभूत मूल्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या मूलभूत रचनेत विविधता आणि एकतेचा समावेश असल्याचेही भागवत यांनी सांगितले. अमेरिकेची ओळख बहुविधतेशी जोडली जाते, तर भारताची ओळख ‘विविधतेतील एकता’ या संकल्पनेशी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताचे वैशिष्ट्य केवळ विविधतेत नसून त्या विविधतेतून निर्माण होणाऱ्या एकतेत आहे. विविधतेमुळे एकत्वाला अधिक सौंदर्य प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत प्रत्येक राष्ट्राचे एक विशिष्ट ध्येय असते आणि भारताचे ध्येय जगाला विविधतेतील एकतेचा अनुभव देणे आहे, असे भागवत यांनी नमूद केले. समाजाला योग्य विचार आणि मूल्यांचे शिक्षण मिळाले नाही, तर त्याची दिशाभूल होऊ शकते, असा इशाराही भागवत यांनी दिला. इतिहासातील काही काळात समाजातील एकजूट कमी झाल्याने देशा पीला परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला आणि त्यातून मोठे नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले.

Exam Cancelled : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! क्लार्क टायपिंग परीक्षा रद्द

धार्मिक विधींबाबत बोलताना भागवत यांनी सांगितले की, जगातील विविध धर्म त्यांच्या विशिष्ट धार्मिक पद्धती आणि परंपरांमधून ओळखले जातात. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक धर्माने सांगितलेल्या मार्गाचे आणि धार्मिक शिस्तीचे पालन केले जाते. मात्र या विविध मार्गांच्या पलीकडे मानवतेचे एकत्व कायम राहते, हा विचार त्यांनी आपल्या भाषणातून मांडला.

error: Content is protected !!